संजीवनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची  बिर्ला साॅफ्ट, ऑटोमेशन  एआय व केपीआयटी मध्ये निवड -अमित कोल्हे                            

संजीवनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची  बिर्ला साॅफ्ट, ऑटोमेशन  एआय व केपीआयटी मध्ये निवड -अमित कोल्हे

 Selection of Sanjeevani Engineering students in Birla Soft, Automation AI and KPIT – Amit Kolhe

  Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 19.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थी बिर्ला साॅफ्ट,ऑटोमेशन  एआय इन्फोसिस्टिम प्रा. लि. व केपीआयटी या कंपनीनी सात, तीन व दोन विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केल्याने संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती नोकरदार होत असल्याची माहिती संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट चे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.

बिर्ला साॅफ्ट या कंपनीने रितिक किशोर  गाडे, वैष्णवी  विजय नागरे, वैष्णवी  अशोक  टाके, ऋतुजा संदिपराव घोलप, कार्तिक शंकर  मोरे, प्राजक्ता वसंत मुके व विशाल  राजेंद्र खोचे रू ३. ६  लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर निवड केली आहे. ऑटोमेशन  एआय इन्फोसिस्टिम प्रा. लि. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन  लर्निंग, डीप लर्निंग, इमेज एनोटेशन्स, डेटा लेबलिंग, इत्यादी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने रूपेश  राजेंद्र चौधरी , क्षितिजा प्रदिप निकुंभ व कल्याणी रामदास सदाफळ यांची रू ३. ५ लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. तर केपीआयटी इंजिनिअरींग लिमिटेड या कंपनीने पुजा संतोश जगताप व कोमल शांताराम  सुरादे  या दोघींची वार्षिक  पॅकेज रू ६. ५ लाख देवुन नोकरीसाठी निवड केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या  त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड करण्यात अली आहे.        

  मुळात उद्योग जगताला काय अभिप्रेत आहे, या अनुषंगाने  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अधिकचे आधुनिक तंत्रज्ञान शिकविल्या जात असल्यामुळे अनेक विध्यार्थी विविध कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.          

यावेळी शिक्षकांनी अंतिम वर्षातील  ‘हेट स्पीच डिटेक्शन ऑन  सोशल मीडिया युझिंग मशिन लर्निंग अल्गोरिधम’ या प्रोजेक्टची चांगली तयारी करून घेतली, त्यांचा फायदा मला मुलाखत देताना झाला.-रूपेश चौधरी    

संजीवनी अभियांत्रिकी मधुन नोकरी हमखास मिळते याची जाणिव माझ्या वडीलांना होती,मला शिक्षकांनी इलेक्ट्रिकल व्हेईकल्स बाबत सखोल ज्ञान दिले. केपीआयटी कंपनीत माझी नोकरीसाठी निवड झाली.- कोमल सुरादे (नेवासा)        

माझ्या  आई वडीलांनी पाहीलेले स्वप्न संजीवनीमुळे मी पुर्ण करू शकले, याचा मला आनंद आहे – पुजा जगताप (बीड  गेवराईची.)   

Leave a Reply

You cannot copy content of this page