गोधेगावात काळे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये
Activists of Kale group in BJP in Godhegaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 19.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील काळे गटातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत करून बिपीन कोल्हे यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तालुक्यात स्व. कोल्हे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या धोरणामुळे गावागावातील अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले जात आहेत. यापूर्वीही धामोरी, शिंगवे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या फसव्या धोरणाला कंटाळून कोल्हे गटात प्रवेश केला आहे.
भीमराज एकनाथ भोकरे, सागर गोरख भोकरे, गुलाब गणपतराव भोकरे, महेश गोरख भोकरे, भीमराज भाऊसाहेब काटवणे, राहुल नंदू भोकरे, कुणाल विजय पवार, सुजित नंदू भोकरे, गोकुळ नंदू भोकरे, गणपत पाराजी भोकरे, रोहित गोरख भोकरे, राहुल यशवंत चंदनशिव, शरद यशवंत चंदनशिव, राजेंद्र सुखदेव भोकरे, नारायण गीताराम नवले, पुंजाहरी आनंदा भोकरे, शामराव रामदास सोळसे, रामदास भाऊसाहेब काटवणे, साई आबासाहेब भोकरे आदी युवक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी माधवराव लहादू रांधवणे, वाल्मिकराव मुरलीधर भोकरे, साईराम तुकाराम कोळसे, जनार्दन काशिनाथ शिंदे, रवींद्र अर्जुन रांधवणे, भाऊसाहेब कारभारी शिरसाठ, अनिल चांगदेव भोकरे, सुभाषराव नारायण कानडे आदी गोधेगाव येथील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.