संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड 

संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

Selection of Sandeep Varpe as General Body Member of Ryat Shikshan Sanstha

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 31July, 19.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : राष्ट्रवादीचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची निवड केली आहे. रविवारी ३१ जुलै रोजी सातारा येथे पार पडलेल्या मॅनेजिंग कौन्सिल च्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

संदीप हे यांचे वडील के जे सोमय्या कॉलेजचे माजी प्राचार्य व  आई सदगुरू गंगागीर महाराज कॉलेजच्या माजी प्राध्यापिका ( रयत सेवक ) यांचे चिरंजीव आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन अभियांत्रिकी पदवीधर आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष, सभापती कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळ (त्या काळात आजपर्यंत ची नगरपालिका शाळांची २० वर्षातली सर्वोच्च पटसंख्या ) गेल्या ५ वर्षांपासून एस एस जी एम कॉलेजच्या स्थानिक विकास समितीचे सदस्य म्हणून कार्यरत,माजी नगरसेवक, कोपरगाव नगरपालिकेमध्ये ५ नंबर तळ्याची मागणी करणारे पत्र देणारे प्रथम नगरसेवक. शरद पवार व पवार कुटुंबियांच्या जवळचे व्यक्तिमत्त्व राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा मोठा फायदा रयत शिक्षण संस्थेला होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे,दिलीप वळसे पाटील, उत्तर विभागाचे अध्यक्ष आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, भगीरथ काका शिंदे,मीनाताई जगधने,राजेन्द्र फाळके, अरुण कडू पा.,अशोकराव बाबर, पद्माकांत कुदळे या मान्यवरांसह राज्यातील राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तसेच कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी विशेषतः सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. ,

Leave a Reply

You cannot copy content of this page