ज्या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटात प्रवेश केलाच नाही त्यांची नावे देणं हे संभ्रम करणारे- अशोक भोकरे
Giving the names of activists who have not joined Kolhe group is confusing – Ashok Bhokare
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 31July, 20.10
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : लोकशाहीत कार्यकर्ते पक्ष पक्षांतर करीतच असतात परंतु गोधेगावचे काळे गटाचे जे कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेच नाही त्यांची नावे टाकणे असा बालिशपणा समजू शकतो परंतु हे ज्येष्ठ नेत्यांकडून हे अपेक्षित नाही अशी नाराजी गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी गोधेगावात काळे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये या बातमी संदर्भातव्यक्त केली .
ज्यांनी प्रवेश केला ते ठीक आहे.पण गुलाब गणपत भोकरे, गणपत पाराजी भोकरे, राहुल यशवंत चंदनशिव, शरद यशवंत चंदनशिव, नारायण गीताराम नवले, शामराव रामदास सोळसे, पुंजाहारी आनंदा भोकरे या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटात प्रवेश केलाच नाही अशा काळे गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांची नावे प्रसिद्ध करून या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम कोल्हे गटाने केले. कोल्हे गटात प्रवेश करीत असलेल्या कार्यकर्त्यांची अगोदर खातरजमा करा नंतर बातमी प्रसिद्ध करा. असा सल्ला भोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
स्व. मा. खा कर्मवीर शंकरराव काळे आणि सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांचे नाव घेतले म्हणजे सभ्य राजकारणी अशी प्रतिमा निर्माण होत नाही. त्यासाठी त्यांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे. आपले युवराज राजकारणात नवीन आहेत. आपण मात्र ज्येष्ठ आहात आम्हाला आपल्याकडून अशी अपेक्षा नाही.असे भोकरे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.