जेष्ठ नागरिक सेवा मंचकडुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Distribution of school materials to students by Jeshtha Nagarik Seva Mancha
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 Aug, 15.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीचे वतीने कोपरगाव नगरपालिका व माधवराव आढाव माध्यमिक व मराठी शाळा नंबर सहा मधिल गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक सौ. भावना गवांदे यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , लोकमान्य टिळक प्रतीमा पुजन करण्यात आले महिला समितीच्या अध्यक्षा सौ. सुधा भाभी ठोळे यांनी मनोगत व्यक्त केले शालेय साहित्य/ गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला होता समारंभासाठी रजनी गुजराथी सौ. शैलजा रोहोम डॉ. वर्षा झंवर ह. भ. प. थोरे महाराज डॉ विलास आचारी पेंटर दारूवाला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. वर्षा झंवर व डॉ. विलास आचारी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनासाठी मार्गदर्शन केले.उत्तमभाई शहा यांनी आभार मानले.
जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै. भागचंदभाऊ ठोळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आजही सुरू असल्याने जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समिती व ठोळे परीवाराचे शैक्षणिक संस्थेच्या वतीने आभार मुख्याध्यापक वानखेडे यांनी मानले