सोनेवाडीत महंत कैलासगिरी महाराजांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण
Akhand Harinam Week flag hoisting by Mahant Kailasgiri Maharaj at Sonewadi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 Aug, 16.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील सोनेवाडी येथे सालाबाद प्रमाणे ३८ व्या वर्षाचे अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण कुंभारी येथील देवस्थानचे म्हणत कैलासगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सप्ताह कमिटी भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरोहित विक्रम गुरु यांनी मंत्रोपचार् केला.
यावेळी कैलागिरी महाराज यांनी सांगितले की कलियुगात नामस्मरणाला अतिशय महत्त्व असुन राम कृष्ण हरी नाम उपचाराने मनुष्य जन्माचा उद्धार होतो. कथा कीर्तनासाठी साक्षात भगवंत सुद्धा कार्यक्रमासाठी हजर राहतात असे त्यांनी सांगितले. ध्वजारोहणानंतर कलश मिरवणूक व ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली. मिरवणुकीनंतर ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात करण्यात आली.
ग्रामस्थ भजनी मंडळ व सप्ताह कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सप्ताह अखंड सुरू होत आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४.३० ते ६ काकड आरती, सकाळी ७०३० ते १० श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री ९ ते ११ महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार यांचे कीर्तन, किर्तन नंतर सामुदायिक भजन व जागर होणार आहे.
सप्ताह कार्यक्रमात मृदुगाचार्य अशोक महाराज पांचाळ आनंदी देवाची, श्री वरद विनायक देवस्थान लोणी येथील महंत उद्धव महाराज मंडलिक , श्रावण महाराज जगताप विसापूर, विनोदाचार्य मच्छिंद्र महाराज निकम सलबतपुरकर, चंद्रकांत महाराज खळेकर राहुरी, सुप्रियाताई साठे/ठाकुर महाराज पिंपरी पुणे, बाळकृष्ण महाराज सुराशे साईधाम सेवा आश्रम वारी यांची कीर्तन सेवा होणार आहे तर मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तन लक्ष्मण महाराज पाटील आळंदी देवाची यांचे होणार आहे.
कीर्तन कार्यक्रमाला सात-संगत म्हणून मृदंगाचार्य धीरज महाराज कुऱ्हे शिंगणापूर, गायनाचार्य अशोक महाराज बोळीज, अक्षय महाराज चेंद्रे ,बालाजी महाराज गडदे, मयूर महाराज येवले तर सदगुरु गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ सात संगत करणार आहे. या सप्ताह कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वारकरी भजनी मंडळ, सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.