शिवसेनेचे जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व सिध्द करणार; सर्व निवडणुका शिवसेना एकट्याने लढणार- बबनराव घोलप
Shiv Sena will prove its undisputed supremacy in the district; Shiv Sena will fight all elections alone- Babanrao Gholap
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 Aug, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून शिर्डी लोकसभेचा आगामी खासदार व उत्तरनगर जिल्ह्यात कमीतकमी चार आमदार निवडून आणून शिवसेनेचे जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व सिध्द करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे माजीमंत्री तथा उत्तरनगर संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी मंगळवारी ( २ ऑगस्ट) रोजी शिर्डी विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तरनगर संपर्क प्रमुख नेमणूक झाल्यानंतर आपण शिर्डी येथे कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली अशी माहिती बबनराव घोलप यांनी प्रसार माध्यमांना दिली.
श्री घोलप पुढे म्हणाले कार्यकर्त्यांच्या निवडणुका माझ्या दृष्टीने महत्वाच्या आहेत कारण ज्या कार्यकर्त्यांच्या जिवावर आम्ही आमदार आणि खासदार होतो त्या कार्यकर्त्यांना आगामी काळात नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना प्रथम न्याय द्यायचा अन त्यानंतर पक्षाचे जे काही काम आहे ते सुरळीतपणे करायचे असा माझा प्रयत्न आहे.या सर्व निवडणुका एकट्या शिवसेना पक्षाच्या वतीने लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. बबनराव घोलप म्हणाले, कोणी जर कोणाच्या दावणीला असेल तर ती दावणी काढून घेतली जाईल. धनुष्यबाण या हे बाळासाहेबांनी निर्माण केलेले चिन्ह आहे.सध्या हि न्यायालयीन बाब आहे मात्र धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडेच राहाणार असून शिवसेनेचाच विजय होणार आहे. जे काही फुटले त्यांच्या अजून ठिक-या ठिक-या होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमचा शिवसेनेचे एकटा वाघ त्यांच्याशी लढत होता.खा. राऊत यांचे तोंड बंद करण्यासाठी भाजपने ईडीची कारवाई केली आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या विधानावर उत्तर देतांना घोलप म्हणाले की, विरोधकांनी अशीच भाषणे करायची असतात, त्यांनी त्यांचे काम केले आम्ही आमचे काम करु.शिवसेना संपर्क प्रमुख या नात्याने जिल्ह्यात अजून शिवसेना कशी खोलवर जाईल यासाठी माझा प्रयत्न राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, भरत मोरे, सुहास वहाडणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन कोते, कमलाकर कोते, राहाता तालुकाप्रमुख संजय शिंदे, माजी.उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, जिल्हा संघटक विजय काळे, ग्राहक संरक्षणचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सिनगर, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, अकोले तालुकाप्रमुख मछिंद्र धुमाळ, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, विधानसभा संघटक असलम शेख, दादा कोकणे, दिनेश शिंदे, उपशहर प्रमुख सुयोग सावकारे, उपतालूकाप्रमुख अक्षय तळेकर, अमोल गायके सुनील परदेशी, माजी नगरसेवक सागर लुटे, भागवत लांडगे,आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
चौकट
नगर जिल्हा हा कट्टर शिवसैनिकांंचा मतदार संघ आहे.आहे.आता मी आल्याने गटतट राहाणार नाहीत. उत्तर नगरची परिस्थिती पाहता खासदारकीसाठी राखीव झाल्याने आणखी घट्ट झाला असून याठिकाणी कोणतीही गद्दारी होणार नाही. एकही शिवसैनिक लोखंडे बरोबर गेला नाही, लोखंडे एकटेच गेले आहेत. बैठकीत शिवसैनिकांनी व्यक्त केलेल्या तीव्र भावना व केलेली घोषणाबाजी पाहता त्यांचा समाचार घेण्यास शिवसैनिक सक्षम आहे – माजी मंत्री बबनराव घोलप .