कोकमठाण १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सुरुवात

कोकमठाण १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सुरुवात

Kokamthan 175th Akhand Harinam Week begins with great enthusiasm

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 Aug, 19.20
By
राजेंद्र सालकर

महंत रामगिरी महाराजांच्या रथाचे सारस्थ करताना विवेक कोल्हे व आमदार आशुतोष  काळे (फोटो दत्ता गायकवाड)

कोपरगाव : आशिया खंडातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह ज्याची गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद असून ज्याची आज धार्मिक परंपरेनुसार सुरुवात झाली. १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त कोकमठाण परिसरात सडा रांगोळ्या घालून गुडया तोरणे उभारण्यात आल्या होत्या पाना फुलांनी सजवण्यात आले होते, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, त्यानिमित्त महंत रामगिरी महाराज यांची सनई चौघडा च्या निनादात टाळ मृदुंगाच्या ढोल ताशाच्या गजरात सवाद्य फुलांची मुक्त उधळण करत महिलांनी फुगड्या खेळत मिरवणूक काढण्यात आली.

महंत रामगिरी महाराज यांचे पाद्यपूजन व स्वागत करताना आमदार आशुतोष काळे व विवेक कोल्हे (फोटो दत्ता गायकवाड)

पुणतांबा चौफुली ते जंगली महाराज आश्रम शेजारील भव्य मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी महंत रामगिरी महाराजांचे अनेकांनी पाद्यपूजन केले, सजवलेल्या बग्गी रथात महंत रामगिरी महाराजांच्या रथाचे सारथ्य आमदार आशुतोष काळे व शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.                 

 

 

महंत रामगिरी महाराजांचे कोकमठाण येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी संत रामदासी महाराजांच्या तीन खणीमध्ये जाऊन दर्शन घेतले. मिरवणुका वेळी दुतर्फा मोठी गर्दी झाली होती ,महिलांनी डोक्यावर तुळशीचे कलश ज्ञानेश्वरी घेतल्या होत्या, लहान मुलांनी राम-लक्ष्मण हनुमान विविध ऋषीमुनींच्या छटा सादर केल्या. त्ते सर्वांच्या आकर्षण ठरले. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात कोपरगाव शिर्डी  रस्त्यालगत या पवित्र पुण्यभूमी तिर्थक्षेत्री सप्ताहाच्या प्रथेप्रमाणेच ध्वजारोहण याआधी केलेच होते. या प्रसंगी हजारो उपस्थित भाविकांचे स्वागत करताना तसेच भाविकांना मार्गदर्शन करताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की, योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत हा अखंड हरिनाम सप्ताह लेने को हरिनाम देने को अन्नदान या उक्ती प्रमाणे सुरू केला. अखंड हरिनाम सप्ताह हे तर सद्गुरु चे धर्मकार्य आहे हे आपण सर्वांनी तन मन धन लावून पुढे सुरू ठेवले पाहिजे, गंगागिरी महाराज यांनी अध्यात्मिक वारकऱ्यां सह समाजाला एक नवी दिशा दिली योगीराज गंगागिरी महाराज यांची वारकऱ्यां सह समाजाला एक नवी दिशा दिली.

योगीराज गंगागिरी महाराज यांची ही सप्ताहाची परंपरा दोनशे वर्षापासून अविरत सुरू आहे महाराष्ट्रात अनेक परंपरा खंडित झाल्या मात्र आपले स्वतःची परंपरा अविरत सुरूच राहील असे महाराज म्हणाले.

जंगली महाराज आश्रमाच्या वतीने विद्यार्थ्यांनी फुले उधळून महाराजांच्या मिरवणुकीचे स्वागत केले. महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीची वाटप करण्यात आले

१७५वा अखंड हरिनाम सप्ताह मिरवणुकीत 
मर्दानी खेळ, लाठी काठी, दांड पट्टा, या खेळ सादर करताना मुंबादेवी तरुण  मंडळाचे मुले मुली (फोटो दत्ता गायकवाड)
योगिराज सदगुरु श्री.गंगागिरीजी महाराज १७५वा अखंड हरिनाम सप्ताहात मिरवणुक प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुंबादेवी तरुण मंडळाचे मर्दानी खेळ, लाठी काठी, दांड पट्टा, या खेळ बघण्यासाठी उपस्थिती लावली. व मुलांचे कौतुक केले.
त्यावेळी अध्यक्ष  सुनील फंड, भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, साकोली संपर्कप्रमुख मनोज कपोते,  संजय जगताप सुनिल खैरे, संदिप दळवी, .सुनिल मोरे .राहुल देवळालीकर,.लतिफसर आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती  रमेशगिरी महाराज आत्मा मलिक ध्यान पिठाची संत महंत, आमदार आशुतोष काळे, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे ,माजी सभापती संभाजी रक्ताटे, शरद नाना थोरात  आदींसह बेटातील शिष्य गण पंचक्रोशीतील हजारो वारकरी भाविक, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह, सर्व पोलीस प्रशासन, महसूल प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

चौकट                                           

गंगागिरी महाराज सप्ताहास शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ३१ लाख रुपये ,तर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने ५१ लाख रुपये सर्व सभासद कामगारांच्या वतीने दोन्ही युवा नेत्यांनी देणगी जाहीर केली. व सप्ताह काळात कोणतीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. पहिल्या दिवशी भाविकांना पुरणपोळी व दुधाच महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. ,                          

Leave a Reply

You cannot copy content of this page