कोपरगाव : शहरातील निवारा कोजागिरी कॉलनी परिसरात राहणाऱ्या सौ. विमल जनार्दन खामकर (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे ज्येष्ठ सदस्य जनार्धन खामकर यांच्या त्या पत्नी होत्या.
त्यांचे निधनाबद्दल समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, रिक्षा संघटना उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, नगरसेवक जनार्धन कदम, आदींनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.