सेवा समजून शुक्लेश्वर देवस्थानास निधीसाठी  प्रयत्न करणार- ना. आशुतोष काळे

सेवा समजून शुक्लेश्वर देवस्थानास निधीसाठी  प्रयत्न करणार- ना. आशुतोष काळे

Will try to fund the Shukleshwar Devasthan by understanding the service – no. Ashutosh Kale  बेट मोहनीराज भागाचा उत्कर्ष करणारBet Mohiniraj will flourish the area

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 Aug, 17.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : ऐतिहासिक, पौराणिक वारसा व देशात एकमेव असलेले शुक्लेश्वर देवस्थान आपल्या कोपरगाव तालुक्यात आहे हि आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या देवस्थानाच्या ठिकाणी वर्षभर भाविकांची वर्दळ असते मात्र या देवस्थानचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे भाविकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाविकांना येणाऱ्या अडचणी व देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या मागणी नुसार सुशोभीकरणासाठी ३ लाख रुपये निधी दिला आहे. परंतु यावरच न थांबता आद्यगुरु शुक्राचार्यांची सेवा समजून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करून बेट मोहनीराज भागाचा उत्कर्ष करणार असल्याचे ग्वाही  श्री. साईबाबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील बेट परिसरात कहार समाजाच्या मागणीनुसार सामाजिक सभागृह बांधणे व श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मतदार संघाचा चौफेर विकास साधतांना शहर व ग्रामीण भागाला एकच न्याय दिला आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकासाला देखील प्राधान्य दिले असून मतदार संघातील श्री मयुरेश्वर देवस्थान, पोहेगाव, श्री.लक्ष्मीआई देवस्थान, कोकमठाण, श्री जगदंबा माता देवस्थान, ब्राम्हणगाव आदी देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळविला असून अनेक देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मतदार संघातील सर्वच देवस्थानांचा विकास करायचा असून यामध्ये शुक्लेश्वर देवस्थान अग्रभागी आहे. त्यामुळे भविष्यात या देवस्थानाचा विकास करून भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी माझे प्रयत्न राहील. बेट मोहनीराज भागाच्या स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपये निधी दिला असून १३१.२४ कोटीच्या पाणी योजनेतून मोहनीराज भागासाठी पाण्याची टाकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कहार समाजाने काळे परिवार आणि माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मला त्यांच्या प्रेमातून उतराई व्हायचे नाही कायमच त्यांच्या ऋणात राहायचे असून या समाजाच्या अडचणी सोडविणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे या समाजाची मागील अनेक वर्षापासूनची सभागृहाची मागणी पूर्ण करतांना मला विशेष आनंद होत आहे. यापुढे देखील कहार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष कार्तिक सरदार, श्री शुक्लेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, डॉ. तुषार गलांडे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार,  आकाश डागा, इम्तियाज अत्तार, एकनाथ गंगूले, विलास आव्हाड, शैलेश साबळे,  तेजस साबळे, गणेश लकारे, सोमनाथ आव्हाड,  कैलास मंजुळ, प्रसाद प-हे,  अशोक लकारे, मुन्ना आव्हाड,  विशाल राऊत, संजय वडांगळे, गणेश बोरुडे,  विलास पाटोळे, भाऊसाहेब भाबड, नितीन शिंदे, रविंद्र राऊत, राजेंद्र जोशी, निलेश पाखरे, तन्मय साबळे, प्रताप गोसावी,  बाळासाहेब बारसे, दिपक गंगवाल, वाघ गुरुजी, अशोक लकारे,  हरिभाऊ लकारे,  तुकाराम गहिरे, अशोक बेंद्रे, संजय कडवे, सोमनाथ गंगूले, हेमंत लकारे,  बालाजी लकारे, संदीप पंडोरे,  विठ्ठल लकारे, पोपट लिंभुरे, पोपट लकारे,  हरिभाऊ पंडोरे, ईश्वर पंडोरे, गणेश गंगूले,  नंदू पंडोरे, हारुण शेख, शितल वायखिंडे,  भाग्यश्री बोरुडे, मीराबाई साळवे, अनिता परदेशी, ज्योती आव्हाड, शितल लोंढे,  अनिता जिरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page