समीरण जोशीचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार
Sameeran Joshi felicitated by Sanjeevani Industry Group
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 7 Aug, 15.00
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : कोपरगांवसारख्या ग्रामिण भागात राहुन शिक्षणातील अडचणी दुर करून चिरंजीव समिरण याने संगणक शिक्षणासाठी गुणवत्तेच्या जोरावर थेट अमेरिकेत निवड होण्याचा मान मिळविला, त्याने आई सौ. स्मिता तसेच वडील विधीज्ञ जयंत आत्माराम जोशी यांचे नांव उज्वल केले असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
संगणक अभियंता चि. समिरण जयंत जोशी याची पुढील शिक्षणासाठी थेट अमेरिकेच्या नामांकित युटा प्रांतात सॉल्टलेक येथे परम संगणक शिक्षण आणि सेमी कंडक्टर संशोधनासाठी साडेपाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबददल त्याचा कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
विधीज्ञ जयंत जोशी याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, चि. समिरण याचे शालांत शिक्षण सेवानिकेतन तर उच्च शिक्षण सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयात झाले, त्यानंतर अभियांत्रीकीचे शिक्षण पुणे येथे पुर्ण केले.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहु महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगोत्री वंचितांच्या दारात आणण्याचे महान कार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजनेला प्राधान्य दिले. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद आदी धर्तीवरील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, व्यवस्थापकीय, सैनिकी शिक्षण मिळावे यासाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत हजारो अभियंते घडवले.
शिक्षणातुन मनूष्य समृध्द व ज्ञानसंपन्न होतो. चिरंजीव समिरण याने आई वडीलांचे संस्कार व समर्थांची शिकवण आत्मसात करत भारत देशाचा झेंडा थेट अमेरिकेच्या युटा प्रांतात उंचावल्याचे सांगुन त्याच्या संगणकीय शिक्षणासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्याकडुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बंधु निरंजन, गोसेवक प्रगतशिल शेतकरी धनंजय जोशी, सौ. दिपश्री जोशी, श्रीनिवास ट्रेडर्सचे मकरंद जोशी, मिताली जोशी आदि उपस्थित होते.