उज्वल परंपरा कायम : नामदेवराव परजणे पाटील जुनिअर कॉलेज चा निकाल ९७.६७ %
विज्ञान शाखा १०० % ; वाणिज्य शाखा ९६.२९%
८ विद्यार्थिनी विशेष प्राविण्य, तर ६० विद्यार्थिनी प्रथम श्रेणी
वृत्तवेध ऑनलाइन । 18 July 2020
By Rajendra Salkar :
कोपरगांव : प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित नामदेवराव परजणे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,कोपरगांव चा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९७.६७ टक्के इतका लागला असून महाविद्यालयातील ८ विद्यार्थिनी विशेष प्राविण्य, ६० विद्यार्थिनी प्रथम श्रेणी गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहे.
संतोषी प्रदीप पिंगळे ही विद्यार्थिनी ७३.६९ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली तसेच फातेमा समीर मुलानी ७३.२३ टक्के,स्नेहा अविनाश कुऱ्हे ६५.०७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे. तर विज्ञान शाखेचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे ; तसेच वाणिज्य शाखेचा निकाल ९६.२९ टक्के इतका लागला असून प्रियंका सोपान कासार ८६ टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम आली , चंचल समाधान बोंबले ८१.२३ टक्के व रोशनी बाळासाहेब बोंबले ८१.०७ टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनीसाठी दर्जेदार व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी संस्था प्रशासन सदैव तत्पर राहील अशी ग्वाही महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी तथा जि.प.शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे यांनी उत्तीर्ण विद्यार्थिनींचे अभिनंदनपर मनोगत व्यक्त करतांना दिली.विद्यार्थिनींना दत्तात्रय सोनवणे,शबनम पटेल,शैलेश कुलकर्णी,भारती करपे,रंजना बारगळ, आनंद शिंदे,सोमनाथ सूर्यवंशी ,पूनम जिभकाटे,माया दवणे ,श्रीरंग वाघ यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा.जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,जि.प.सदस्य राजेश परजणे,सचिव प्रा.डॉ.हरिभाऊ आहेर,महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी सौ.सुनीताताई कदम,प्र.प्राचार्य एस.डी.खर्डेकर यांनी अभिनंदन केले.
Post Views:
317