सावधान : कोपरगाव शहर व तालुक्यात आता एकुन १५ जण पॉझिटिव्ह ; उपचार सुरू
त्या १४ जणांपैकी ३ जण पॉझिटिव्ह
सुरेगावात टाळेबंदी
कोपरगाव कोरोना अपडेट : १८ जुलै २०२०
३५९ तपासण्या, २७ जण कोरोना ग्रस्त, १२ जण कोरोनामुक्त, तर एका महिलेचा मृत्यू, १५ जण पॉझिटिव्ह, ३१९ अहवाल निगेटिव्ह
वृत्तवेध ऑनलाईन | 18 July 2020,
corona virus
कोपरगाव : दरम्यान गेल्या आठ दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या त्या १४ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले १४ पैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर फुलसौंदर म्हणाले, १४ संशयितांचे नमुने आठ-दहा दिवसांपूर्वी नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते या १४ अहवालां शनिवारी १८ जुलै रोजी संपले या १४ पैकी ३ अहवाल जणांचे पॉझिटिव्ह आले तर उर्वरित ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यांच्यावर कोपरगाव कोवीड सेंटर मध्ये उपचार सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सुरेगाव संपर्कातील ८४ जणांची रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट करण्यात आली यात फक्त एक ४५ वर्षांची एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. तर उर्वरित ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. शनिवारी आलेल्या अहवालात ३ पॉझिटिव्ह ११ निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी शामवाडी येथील १ पुरुष कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे सदर इसम हा पुण्याहून १५ जुलै रोजी येथे आला होता. शनिवारी एकूण ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोवीड सेंटर मध्ये १५ कोरोना ग्रस्तावर उपचार सुरु आहेत. तर शनिवारी १४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.
दरम्यान कोवीड सेंटर मध्ये ४८ जण होम क्वॉरंटाईन असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.