समृद्धीच्या डकमुळे येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करा – ना. आशुतोष काळे
Urgently remove the problems of the citizens due to the duck of Samriddhi – No. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 19.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव :- बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातील ११ गावातून जात असून या महामार्गावर ठिकठिकाणी महामार्ग ओलांडून जाण्यासाठी डकची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हेच डक समृद्धी महामार्गा लगतच्या गावातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यामुळे शेतीचे नुकसान होवून नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी करून नागरिकांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मागील काही महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यात या समृद्धी महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे महामार्ग ओलांडून जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या डकमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे लगतच्या शेतीचे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत या अकरा गावातील नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांच्यापुढे होत असलेल्या त्रासाचा पाढा वाचला होता. त्याची दखल घेवून ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या संपूर्ण ३० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची पाहणी करून सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. यामध्ये चांदेकसारे गावातील चराच्या पाण्याचे नियोजन करणे, देर्डे कोऱ्हाळे, पाथरे शिव रस्त्यावर मोठे सिमेंट पाईप टाकणे,कोकमठाण पुणतांबा रोडवरील डक मधील खड्डे बुजवणे, चर काढून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, कोकमठाण कारवाडी सडे कोकमठाण डक मधील साचलेल्या पाण्याची व्यवस्था करणे, चांदेकसारे येथील ५२५ डक वर साचलेल्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून भविष्यात असे नुकसान नुकसान होणार नाही त्याबाबत कायमस्वरूपी उपाय योजना करा.धोत्रे लौकी येथील पुल वाहून गेला असून आहेर वस्ती रस्ता पूर्ण पाण्यात गेला आहे त्याबाबत तातडीने काम सुरु करा. वारी भोजडे रस्त्यावरील वीरभद्र मंदिरा शेजारील साचलेले पाणी काढून देण्यासाठी चर काढून द्या, धोत्रे येथील डक मध्ये पाणी साचल्यामुळे कांदा चाळ व घरात पाणी शिरले,धोत्रे वारी,धोत्रे लाख रस्ता पूर्ण खराब झाला आहे त्यामुळे हा डक साफ करून पाणी काढून द्या,धोत्रे भोजडे शिवार रस्त्याला चर काढा,चांदेकसारे इस्लामवाडी रस्ता काँक्रीटीकरणाची भिंत वाढवा अशा सूचना ना. आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सुधाकरराव रोहोम, शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, गोरक्षनाथ जामदार, माजी पं. स. सदस्य मधुकर टेके, सुधाकर होन, राजेंद्र खिलारी, शिवाजीराव शेळके, आजीराम खटकाळे, रामदास खटकाळे, सागर खटकाळे, अशोक खटकाळे, दिगंबर जाधव, भाऊसाहेब भवर, रमेश काळे, अंबादास औताडे, दिनकर काजळे, विशाल जाधव, बाळासाहेब थोरात, लक्ष्मण चौधरी, देवचंद कढेकर, आण्णासाहेब जामदार, राजेंद्र माळवदे, रविंद्र जामदार, चांगदेव चव्हाण, गणेश घाटे, मच्छिन्द्र जगताप, दिपक रोहोम, संजय थोरात, संतोष लोंढे, अनंत रक्ताटे, अजित रक्ताटे, सुनिल लोंढे, शरद फटांगरे, सोमनाथ महाजन, विलास चव्हाण, सचिन होन, कृष्णा शिलेदार, दत्तात्रय डूबे, कारभारी शेख, किरण होन, रविंद्र खरात, दादासाहेब होन, अशोक होन, बबलु शेख, काशिनाथ डूबे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वाय. जी. पाटील, राज कन्स्ट्रक्शनचे सुमेध वैद्य, सतिश चौगुले, ड्रेनेज विभागाचे किशोर शिंदे, आदींसह लौकी, भोजडे, धोत्रे, कान्हेगाव, संवत्सर, कोकमठाण, चांदेकसारे येथील नागरिक उपस्थित होते.





