स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव; माहेगाव देशमुख येथे वृक्षरोपण
Nectar Festival of Freedom; Plantation of trees at Mahegaon Deshmukh
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 14 Aug, 16.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव :- देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गावोगावी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली असून कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, आपण देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करीत आहोत. यामध्ये देशातील सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला आहे. हि अतिशय अभिमानाची बाब आहे. आज संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरण्याचे मोठे आवाहन असून त्यावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे हि काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर मागील काही वर्षापासून प्लास्टिकचा वाढलेला वापरामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. याची सर्वांनी गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरु असलेल्या पावसाळ्यात व्यापक स्वरुपात वृक्ष लागवड करून या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर बेसुमार वृक्षतोड थांबवून वनराईचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावे व दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी टाळावी असे आवाहन केले.
यावेळी संभाजीराव काळे, उपसरपंच विकास रणसिंग, सुंदरराव काळे, माधवराव काळे, भास्करराव काळे, राधकीसन काळे, भाऊसाहेब लांडगे, भीमराव काळे, दिलीप मोहिते, मच्छिंद्र जाधव, रविंद्र काळे, उल्हास काळे, सुखदेव काळे, संजय रणसिंग, इंद्रभान पानगव्हाणे, रावसाहेब काळे, बापूसाहेब जाधव, ज्ञानेश्वर काळे, भिकन सय्यद, प्रकाश पानगव्हाणे, संभाजीराव दत्तात्रय काळे, के.पी. रोकडे, बाळासाहेब पानगव्हाणे, मच्छिंद्र गावित्रे, दादासाहेब भगुरे, वसंतराव काळे, संतोष लांडगे, भारत पानगव्हाणे, सुरेश काळे, वाल्मिक भगुरे, सुरेश लहानु काळे, बाबासाहेब पानगव्हाणे, प्रकाश चव्हाण, किरण देशमुख, रशीद शेख, बाळासाहेब रोकडे, प्रल्हाद काळे, श्रीकांत काळे, विनायक राजोळे, प्रकाश चव्हाण, धनंजय काळे, लक्ष्मण लांडगे, संदीप काळे, रावसाहेब पानगव्हाणे, चंद्रभान रोकडे, चंद्रकांत कापसे, मंगेश काळे, सचिन काळे, अनिल काळे, वरुण नवले, आतिष काळे, वैभव काळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडल कृषी अधिकारी राजेश तुंभारे, कृषी पर्यवेक्षक सुनील गावित, कृषी सहाय्यक विजय आहिरे, वन विभागाचे निलेश रोडे, ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.