कोपरगावात ११११ फुट लांबीच्या समता तिरंगा ध्वज रॅली
1111 feet long Samata Tricolor flag rally in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun14 Aug, 16.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : . कोपरगाव निवाऱ्यातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात सोमवार १५ ऑगस्ट रोजी ७५ फूट उंच भव्य तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण तहसिलदार विजय बोरुडे यांच्या हस्ते करण्यात येणार तर ११११ फूट लांबीचा तिरंगा ध्वजासह गांधी पुतळाचे निवारा समता तिरंगा रॅलीचे काढणार येणार काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिक युवराज गांगवे रॅलीचा शुभारंभ करणार असल्याची माहिती समता समुहाचे काका कोयटे यांनी दिली.
या कार्यक्रमाला शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, डॉ.विकास घोलप, मनोज सोनवणे, नामदेव ठोंबळ, श्रीमती शबाना शेख आदी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तिरंगा भव्य रॅलीचे आयोजन काका कोयटे, सुधीर डागा, संदीप कोयटे, राजकुमार बंब, परेश उदावंत, सौ.स्वाती कोयटे, प्रदीप साखरे, जनार्दन कदम, सुमित सिनगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या भव्य अशा रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे.असे आवाहन समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले आहे.
Post Views:
233