युरियाची टंचाई दूर व्हावी आ.आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

युरियाची टंचाई दूर व्हावी आ.आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिक लक्ष घालण्याचे आदेश

वृत्तवेध ऑनलाईन 18 जुलै 2020

By : Rajendra Salkar 

कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई जाणवत असून हि टंचाई दूर व्हावी अशी मागणी  आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असून पालकमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिक लक्ष घालण्याचे आदेश दिले आहे.

युरिया टंचाई

शनिवार (दि.१८) रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी कोरोनाचा उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सखोल माहिती दिली. यावेळी आमदार काळे यांनी पालकमंत्र्यांचे युरिया टंचाईकडे लक्ष वेधून टंचाई दूर करण्याचे साकडे घातले.
शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत निर्णय केल्या चांगल्या पावसामुळे पिके जोमात असेल युरिया खतामुळे उत्पादन घटू नये. यासाठी लवकरात लवकर युरिया खताचा साठा उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. याची दखल घेत नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तातडीने युरिया याबाबत युद्धपातळीवर कारवाईचे आदेश दिले
आशुतोष काळे यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री ना हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page