बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न.
Flag Hoisting Completed in Balasaheb Thackeray College.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 15 Aug, 17.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : १५ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दादासाहेब औताडे चेअरमन पोहेगाव नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर.जावळे यांनी स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षाच्या काळात भारताने विविध क्षेत्रात केलेल्या चौफेर प्रगतीचा आढावा घेतला. त्यामध्ये शेती ,उद्योग , तंत्र विद्या ,महिला विकास माहिती तंत्रज्ञान ई.७५ वर्षाच्या काळात देशाची प्रगती होत असताना भारतात महागाई,बेकारी,दारिद्र्य,आर्थिक विषमता,आरोग्य सुविधांचा अभाव, राजकारणातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दहशदवाद , स्रीयांवर होणारे अत्याचार या समस्याविषयी चिंता व्यक्त केली.
१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थांचा सहभाग घेण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निम्मित विविध कार्यक्रम घेण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सेवक वृंद, विद्यार्थी, पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचा सेवक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.