स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयात ध्वजारोहण
Amrit Festival of Freedom; Flag Hoisting at Lions Mute Deaf and Handicapped School
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon15 Aug, 17.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : “लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालय सुरु करताना परिसरातील शेतकरी, उद्योजक, मा. डॉ. शांतीलाल सोमैया, श्री. साईबाबा संस्थान शिर्डी, इ. अनेकांचे बहुमोल सहकार्य लाभले व आज हे विद्यालय विकासाच्या मोठ्या टप्प्यावर उभे आहे, त्याचा मनस्वी आनंद आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी धजारोहण समारंभ के.जे. सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व सेवकवृंद आणि सन फ्रांसिस्को (अमेरिका) येथील उद्योजक . प्रकाश दारके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे, त्याचा ही विशेष आनंद आहे”. असे प्रतिपादन को.ता.एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष
अशोक रोहमारे यांनी केले.
प्रकाश दारके म्हणाले की, “मी साकरवाडी येथे शिक्षण घेतले व सोमैया महाविद्यालय परिवाराशी माझे पूर्वीपासूनच स्नेह-संबंध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव प्रसंगी मी लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४० हजार रु. व येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यापैकी हुशार व आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या ५ विद्याथर्यांसाठी २० हजार रु.देणगी जाहीर करीत आहे. मला या मातृभूमीच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्यास उपस्थित राहता आले, हे मी माझे भाग्य समजतो.”
याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव म्हणाले की, “आपण नशीबवान आहोत, की, आपणास आज हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभले आहे. मात्र हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी हौतात्म्य पत्करले, त्यांची आठवण ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे. अलीकडे देशामध्ये वाढत चाललेली सांप्रदायिकता व उन्माद हा चिंतेचा विषय आहे”.
प्रारंभी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्र सैनिकांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन, बँडच्या तालावर देखणे संचलन केले. तसेच मूक बधिर व अपंग विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कवायती सादर केल्या. तसेच महाविद्यालयाच्या गीतमंचाने ध्वजगीत देखील सादर केले.
सदर प्रसंगाचे औचित्य साधून दिनार कुदळे व अँड. राहुल रोहमारे (महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य), प्रवीण शिंदे, मा. वसंतराव आभाळे यांचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला
तसेच सागर जाधव (भारतीय सैन्यात भरती), दिव्या बोरसे, वैष्णवी राऊत (लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालय), सादिया तांबोळी (प्रथम क्रमांक) , मयूर कोकाटे (द्वितीय क्रमांक), आरती जगताप (चतुर्थ क्रमांक) (के.जे.सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालय) यांचा कोपरगाव मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग व यश प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव अँड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा.जवाहरलाल शहा, मा. अँड. संजय भोकरे, मा.सुधीर डागा, लायन्स क्लबचे अध्यक्ष मा.परेश उदावंत, सचिव मा. बाळासाहेब जोरी, लिओ क्लबचे अध्यक्ष मा.सुनील सिनगर, इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.गुरसळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार-प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. एस.के.बनसोडे व श्री. डुकरे सर यांनी केले.
कार्यक्रमास के.जे.सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सेवक, लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाचे शिक्षक व सेवक, छात्रसैनिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.