स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ध्वजारोहण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ध्वजारोहण

Amrit Festival of Freedom; Flag Hoisting at Sriman Gokulchandji Vidyalaya

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon15 Aug, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव: १५आॕगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमान गोकुळचंदजी विदयालय कोपरगाव येथे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रारंभी संस्थेचे माजी सेक्रेटरी,माजी नगराध्यक्ष आणि थोर स्वातंत्र्य सैनिक कै.जंगुशेठ अजमेरे यांचे प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सचिव दिलीपकुमार अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे,राहुल अजमेरे, निवृत्त मुख्याध्यापक सी.आर बजाज,डी.व्ही.तुपसैंदर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी देशभक्तिपर समुह गीत व समुहनृत्य विदयार्थीनी सादर केली.यानंतर विदयार्थीना राजगिरा लाडु वाटप करण्यात आले.
सुत्रसंचलन एन.के.बडजाते व एस.डी.गोरे यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मवारी आदींसह नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page