सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे ध्वजारोहण बिपीन कोल्हे यांच्या हस्ते.
Flag Hoisting of Sahkar Maharshi Shankarao Kolhe Factory by Bipin Kolhe.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue16 Aug, 15.00
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत महोत्सवी स्वातंत्रदिन साजरा करण्यांत आला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यांत आले.
याप्रसंगी अध्यक्ष विवेक कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सर्व आजी माजी संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.
कारखान्याच्या सुरक्षा विभागाचे सर्व कर्मचा-यांनी सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँडपथकासह ध्वजसंचलन करत अध्यक्ष बिपीन कोल्हे यांना मानवंदना दिली. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. कारखाना इमारतीवर आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई सह दर्शनी भागात व परिसरात विविध ध्वजाची सजावट केल्याने नयनरम्य दृष्य दिसत होते. अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनानिमीत्त भव्य मोटारसायकल रॅली काढण्यांत आली होती.
Post Views:
221