कृषि विभागाने  रानभाज्या बाबत जनजागृती करावी  – ना.आशुतोष काळे

 कृषि विभागाने  रानभाज्या बाबत जनजागृती करावी  – ना.आशुतोष काळे

Agriculture Department should create public awareness about wild vegetables – No. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 16 Aug, 15.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : निसर्गतः शेतात, माळरानावर उगवलेल्या रानभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी असून या रान भाज्यांचा आहारात समावेश करावयासाठी कृषि विभागाने रानभाज्या बाबत जनजागृती करावी असे आवाहन कोपरगाव येथे रानभाज्या महोत्सवात  ना.आशुतोष काळे यांनी केले .

ते पुढे म्हणाले की,रानभाज्यांची कोणत्याही रासायनिक खते, फवारण्या किंवा सिंचनाशिवाय त्यांची वाढ होते.शरीराला आवश्यक, ऊर्जा देणारे, नवीन पेशी तयार होण्यास मदत करणारे, आवश्यक प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्व व पोषकत्व शरीराला मिळणे होय. रानभाज्यांमध्ये पोषणमूल्यही उच्चदर्जाचे असून औषधी गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामीण भागात ह्या भाज्या आवर्जून खाल्ल्या जातात मात्र शहरात हे प्रमाण कमी आहे.त्यामुळे रानभाज्यांचे च महत्व आणि रानभाज्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा  महोत्सव अत्यंत आदर्श उपक्रम असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, वासुदेव देसले, भूमी अभिलेखचे संजय भास्कर, कोपरगाव आगारप्रमुख अभिजित चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता प्रशांत वाकचौरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,  अभियंता दहीफळे, विरपत्नी सरला जाधव, स्वाती चौरे, अंकिता भोसले, मंगल वलटे आदींसह शासकीय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page