कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी आठ जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारी पिकअप व्हॅन पकडली

कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी आठ जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारी पिकअप व्हॅन पकडली

Kopargaon rural police caught a pick-up van carrying eight animals for slaughter

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 18 Aug, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना  कत्तली साठी जनावरे वाहतूक सुरूच आहे  याचा अर्थ एक तर या धंद्यात  तगडी कमाई असावी किंवा कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.

वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र  झाले आहे.
दरम्यान नुकतेच  नगर मनमाड महामार्गावर  येसगाव शिवारातील प्रियंका हॉटेल समोर बुधवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास पिकअप व्हॅन क्र एमएच ४३ एफ ९४४३ जनावरे भरून कत्तलीसाठी जाणाऱ्या एकाला कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने  पाठलाग करत पकडले आहे.
याप्रकरणी  कोपरगाव ग्रामीण  पोलीस ठाण्यात बबलु इद्दू शेख (२२) राहणार बारागाव नांदूर हल्ली मुक्काम कुरण संगमनेर  याच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळी  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ८ जनावरांना जीवदान मिळाले आहे.
पिकअप गाडीत व गायी,  गो-हे व कालवड  अशी आठ जनावरे  असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार  आंधळे अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page