संजीवनी इंग्लिश मिडीयम अकॅडमीक हेडची जबाबदारी प्रा. हरिभाऊ नळे यांच्यावर – सौ. रेणुका कोल्हे
वृत्तवेध ऑनलाइन । 19 july 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मॅनेजमेंटने प्रा. हरिभाऊ नळे यांची अकॅडमीक हेड पदाची जबाबदारी दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्पापासून प्रा. हरीभाऊ नळे हे काम पहाणार असल्याची माहिती व्यवस्थापन समिती सदस्या सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी दिली.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान मिळून तो जगाच्या स्पर्धेत टिकावा या हेतूने ग्रामीण भागात या स्कूलची निर्मिती करण्यात आली. या विदयालयातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेउन देशातील काना कोप-यात विविध ठिकाणी उच्च पदावर काम करत आहे. शाळेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून आजच्या स्पर्धेच्या युगात शाळेनीही विदयार्थी आणि पालकांच्या आवश्यकतेनुसार बदल केले असून शैक्षणिक ज्ञानाबरोबर त्यांच्यातील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे.
वर्षानुवर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम जपलेल्या या शैक्षणिक संकुलामध्ये सध्या आॕनलाईन क्लासेस अविरतपणे सुरू आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शाळेच्या स्थापनेपासून माफक फी आकारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानादानाचे काम संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल करीत आहे. या संस्थेचे अकॕडमीक हेड म्हणून प्रा हरिभाऊ नळे काम पहाणार आहे.