स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोपरगावात वनिता मंडळाची महिला रॅली
Amrit Mahotsav of Freedom Women’s Rally of Vanita Mandal in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 Aug, 18.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील वनिता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्य अमृत मोहोत्सवा निमित्त शहरातुन भव्य महिला रॅली सर्वांचे आकर्षण ठरली. या प्रसंगी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी भारत माता की जय वंदे मातरम् आशा घोषणा दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी, ज्ञानेश्वर चाकणे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले ,राम खारतोडे तसेच तहसील कार्यालय नगरपालिका, पोलीस ठाण्याच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी बिस्किटांचे वाटप केले, तर स्नेहलता कोल्हे यांनी दुधाचे वाटप केले श्री गो विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी मोलाचे सहकार्य केले. साई भगत याने सुभाष बाबु तर स्नेहा भगत हिने भारतमातेची वेशभूषा साकारली.
वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना चिकटे, उपाध्यक्षा शैलजा लावर ,सचिव वृषाली किर्लोस्कर, आरती महाजन, वैदेही किर्लोस्कर, विद्या गोखले, शिल्पा नेने , माधवी नेने, रजनी गुजराती, पुष्पलता सुतार, शैलजा रोहोम,रंजना कुलकर्णी, रुपाली गुजराती, श्रद्धा जवाद ,विमल पुंडे, छाया वैद्य, विशालाक्षी शाळीग्राम ,आश्विनी शिरोडे, संगिता चिकटे,निर्मला भगत,डॉ सोनल वाबळे,डॉ दिपाली आचारी,डॉ सुषमा आचारी, विद्या सोनवणे, ऐश्वर्या सातभाई, शिल्पा रोहमारे, उमा वहाडणे,स्वाती मुळे, वृंदा को-हाळकर आदी महिला कार्यकर्त्या ,महिला पोलीस कर्मचारी ,बहुसंख्येने हजर होत्या