संजय काळेंच्या सत्याग्रहाचा धसका; कटाउट गेले, कमान आली 

संजय काळेंच्या सत्याग्रहाचा धसका; कटाउट गेले, कमान आली 

Sanjay Kalen’s satyagraha collapse; Gone are the cutouts, came the arch

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 Aug, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव :येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गावातील आमदारांचा कटाऊट न काढल्यास आज गुरुवारी अहिंसा स्तंभासमोर सकाळी “न्यायालयाचे आदेश पाळा अवमान टाळा” हा फलक घेऊन एक तास उभा राहण्याचा सत्याग्रह करणार इशारा दिला होता या सत्याग्रहाचा धसका घेऊन तातडीने कट आउट काढण्यात आले असून त्या ठिकाणी  रीतसर परवानगी घेऊन स्वागत कमान उभारण्यात आली आहे. त्यामुळे आपण सत्याग्रस्तगीत केले असल्याचे प्रतिक्रिया  संजय काळे   यांनी दिली

 मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद, पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, तहसीलदार, कोपरगाव यांना पाठवलेल्या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की मा. सर्वोच्च न्यायालय यांनी देशात शुभेच्छा फलक, कमानी उभारणे मुख्य रस्ते अडवून उत्सव घेण्यासाठी मनाई केलेली आहे न्यायालयाचे आदेशाचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे.. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फ्लेक्स, कमानी उभारणे, रस्त्यावर कार्यक्रम हे आपल्या तिघांच्या परवानगी शिवाय शक्य नाही.. परंतु कोपरगाव शहरात आज देखी गल्लोगल्ली शुभेच्छा फलक डौलाने उभे आहेत.. कमानी उभ्या आहेत कोपरगाव शहरातील येवला नाका, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्वामी समर्थ मंदिर हा राज्य महामार्ग आहे. याचा दर्जा अजून काढलेला नाही व कोपरगावच्या मुख्य बाजारपेठ चा हा वागता रस्ता आहे
        मंगळवारी १६  ऑगस्टला  या रस्त्यावर कोपरगाव मधील दोन राजकीय पक्षांनी संपूर्ण प्रशासनाला वेठीस धरून शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली. शहरात रात्री उशिरा पर्यंत तणावाचे व तमाशाचे वातावरण होते..
     दरम्यान प्रशासन व अधिकाऱ्याची राजकीय दबावाखाली होणारी फरफट प्रसार माध्यमातून दिसत होती.या संपूर्ण परिस्थिती ला जबाबदार मी राजकीय पक्षांना न धरता केवळ आणि केवळ आपल्या तिघांना धरत आहे  असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. 
  चौकट.
       तालुक्यातील संवत्सर गावात गोफण गुंडा खेळाची अक्षय तृतीयेला पाच दिवसांची परंपरा होती.. दोन्ही गावातील खेळाचे वाद विकोपाला जाऊ लागले म्हणून शासनाने खेळावर कायमची बंदी घातली.दहीहंडीच्या नावाखाली वाद घालून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत असेल तर पाच वर्षांसाठी दहीहंडी करण्यासाठी बंदी घालावी- संजय काळे 
          

Leave a Reply

You cannot copy content of this page