Kopargaon Ganesh : गणेशोत्सवात मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करावे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले याचे आवाहन
Kopargaon Ganesh: Police inspector Vasudev Desale appeals that mandals should create social message scenes during Ganeshotsav
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 24Aug, 18.10
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : आगामी गणेशोत्सव काळात प्रत्येक गणेश मंडळाने (Ganesh Mandal) कायद्याचे काटेकोर पालन करून जातीय सलोखा आबादीत ठेवून सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करावे. असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गणेश मंडळांना केले आहे .
यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले म्हणाले गेले दोन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे गणेशोत्सव निर्बंधामध्ये साजरा करण्यात आला. मात्र कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठीची अनेक गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. या गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यासाठी रात्री दहा नंतर वाद्य बंद करा ऑनलाईन परवानगी घ्या वर्गणीसाठी कोणावर दबाव आणू नका आधी नियमांचे पालन करा अन्यथा आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला व गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी
पोलीस यंत्रणा व पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. वीज कंपनीलाही सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी सांगितले
कोपरगाव शहर पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजीपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२३) रोजी शांतता समितीच्या सदस्यांची बैठक करण्यात आली होती .
या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक भरत दाते नगरपालिका अधिकारी दीपक बडगुजर वीज कंपनीचे अधिकारी व शांतता समितीचे सदस्य, पदाधिकारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सवाचे नियोजन, विसर्जन पॉईंट कोणते असतील. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कोणता असेल. या विषयी सर्व गणेश मंडळांना माहिती दिली गेली. तसेच नगरपालिके मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.