माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण सत्यात उतरविली
Former Minister Sankarrao Kolhe’s teachings have come true
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 24Aug, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अतिथीगृह प्रमुख काशिनाथ आनंदा वहाडणे यांनी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांची शिकवण सत्यात उतरविली असून त्यांना सापडलेली एकतोळयाची सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत केली त्याबददल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक बिपीन कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष, विवेक कोल्हे यांनीही वहाडणे यांच्या प्रामाणिकपणाबददल कौतुक केले तसेच स्व. शंकररावजी कोल्हे यांचे विचारांची जपणुक सर्व कामगार कर्मचारी व अधिकारी करीत असलेबददल समाधान व्यक्त केले.
याबाबतची माहिती अशी की, कोल्हापुर येथील आश्विक एंटरप्राईजेसचे सुनिल पाटील हे कारखाना कामानिमीत्त कारखाना साईटवर आले होते. ते कोल्हे कारखान्याच्या अतिथीगृहात मुक्कामी थांबले होते, काम आटोपुन ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडे अकोला येथे रवाना झाले. तेथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या हातातील सोन्याची अंगठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या अतिथीगृहात विसरली, त्यावर त्यांनी संबंधीत प्रमुख काशिनाथ वहाडणे यांना भ्रमणध्वनीवर कल्पना देवुन अंगठीची शोधाशोध करण्याची विनंती केली, त्यावर काशिनाथ वहाडणे यांनी सुनिल पाटील ज्या खोलीत निवासासाठी थांबले होते तेथे जाउन शोधाशोध करून अंगठी शोधून काढली. सदरची एक तोळा सोन्याची अंगठी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते मुळ मालक सुनील पाटील यांना परत केली. त्यावर पाटील यांनी काशिनाथ वहाडणे यांच्या प्रामाणिकपणाबददल कौतुक करून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणुकीचा आदर केला.
याप्रसंगी चीफ केमीस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर ए. के. टेंबरे, परचेस ऑफिसर भाऊसाहेब दवंगे, आदि खाते प्रमुख उपखातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
Post Views:
207