पालखेड : पुर्व भागातील बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते
Palkhed: Jalpujan of the water from the dam in the eastern area by Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 25 Aug, 18.30
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी आयुष्यभर पाण्यासाठी संघर्ष करत पूर्व भागात नागरिक, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतक-यांच्या शेती सिंचनासाठी संजीवनी जलसंवर्धन मोहिमेअंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत बंधारे बांधले ते पालखेडच्या पाण्याने चालु हंगामात भरून घेण्यात आले त्याचे जलपूजन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी (२५) रोजी संपन्न झाले.
पूर्व भागातील उक्कडगांव क्रमांक एक, खडकनाला गोरेवस्ती आपेगांव, तिळवणी व शिरसगांव भागवत वस्ती पाझर तलाव पालखेड ओव्हरफलोच्या पाण्याने भरून घेण्यात आले
प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर यांनी केले.
पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव निकम, बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे, तिळवणीचे अशोकराव शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम आदिनी स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे. तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पूर्व भागासाठी केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
.
भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्री महोदयांनी गोर-गरीब, वंचित, शेतकरी बांधवासाठी विकास कामे सुरू केली असून कोपरगांव तालुक्यातील प्रलंबित विकासाचे प्रस्ताव मार्गी लावण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. पूर्व भागात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शासन प्रशासन, संजीवनी कारखाना, लोकसहभाग आणि रोजगार हमी योजनेची सांगड घालत बंधारे, शेततळी, गावतळी, गोडेबोलगेट साखळी बंधारे, दगडी साठवण तलाव यांची मोठया प्रमाणांत निर्मिति करून पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला सर्वोच्य प्राधान्य दिले. आज या बंधा-यात साठलेल्या पाण्यामुळे स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मनातील जलपुर्तीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. पूर्व भागातील असंख्य कार्यकर्त्यांना बरोबर घेत त्यांनी पाणी आणि त्यासाठीचा संघर्ष करत वेळप्रसंगी आपल्याच सरकारला जनतेच्या कामासाठी निर्वाणीचे असंख्य इशारे दिले होते त्याची प्रकर्षाने आठवण होते. खुर्ची, प्रतिष्ठा, पदापेक्षा त्यांनी जनहिताच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले. पालखेड डाव्या कालव्यास समांतर चा-या करून वितरीका ४१ ते ५२ बी तातडीने दुरुस्ती होवुन सीडी वर्कची नव्याने बांधकामे करून मिळावी अशी शेतक-यांनी यावेळी मागणी केली. पूर्व भागातील प्रलंबित समस्या गेल्या अडीच वर्षापासून सुटल्या नाही अशा तक्रारी असंख्य शेतकऱ्यांनी केल्या. वीज रोहित्रे प्रश्न गंभीर आहे.
याप्रसंगी किसनराव गव्हाळे, अन्साराम निकम, रमेश निकम आदिची भाषणे झाली.
याप्रसंगी उक्कडगाव, आपेगांव, तिळवणी, शिरसगांव, सावळगाव, पढेगाव पंचक्रोशीतील सर्वश्री सखाराम निकम, मदन निकम, दादासाहेब निकम, मंगल शिंदे, सरपंच कल्पना निकम, उपसरपंच बबनराव गोविंदराव निकम, बाळासाहेब शिंदे, सोपानराव निकम, वाल्मीक त्रिभुवन, साहेबराव निकम, पोपटराव बर्डे , रेवनाथ निकम, हेमंत निकम, आपेगावच्या सरपंच मंगल भुजाडे, उपसरपंच किरण गव्हाळे, वाल्मीक भुजाडे, संतोष पगारे, प्रकाश गव्हाळे, ज्ञानदेव गायके, दत्तु पाटोळे, गोपीनाथ गव्हाळे, आसाराम गव्हाळे, आसाराम पगारे, कैलास पाटोळे, सिताराम गोरे, नवनाथ गोरे, सोपानराव गव्हाळे, ग्रामसेवक काटे, गोपिनाथ भुजाडे, संतोष गव्हाळे, सौ सुरेखा मोरे, सोमनाथ शिंदे, लक्ष्मणराव वाघ, कल्याणराव वाघ, पिराजी शिंदे, सिताराम पगारे, सुरेश शिंदे, शिवाजी जाधव, बहु शामराव, बन्सी पगारे, बाबासाहेब शिंदे, गंगाराम शिंदे, बाळासाहेब शिंदे, नारायण तुपे, रवींद्र शिंदे, गणेश गायखे, मनोत तुपे, मधुकर शिंदे, अशोकराव गायकवाड, नारायण गायकवाड, शिवाजी जाधव, कैलास मढवे, ज्ञानदेव भागवत, बाळासाहेब भागवत, दादासाहेब सुंबे, मतीन मौलाना, दत्तात्रय घेगडमल, रफिक पटेल, पप्पू गायकवाड, अमोल गायकवाड, अभिजित बोडखे, विक्रम गायकवाड, शिवाजी गायकवाड, परशराम गायकवाड, भिकाजी भागवत, विनोद भागवत, अंकुश गायकवाड, गोकुळ गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.