गुरुपुष्यामृत : प्रमोद अण्णा लबडे स्पोर्टस् क्लब ची स्थापना
Gurupushyamrut: Establishment of Pramod Anna Labade Sports Club
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 25 Aug, 18.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : गुरुपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी प्रमोद अण्णा लबडे स्पोर्ट क्लब ची स्थापना करण्यात आली असल्याची घोषणा शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केली आहे.
स्पोर्ट्स क्लब च्या वतीने गुरुवारी (२५) रोजी सोमय्या ज्युनियर कॉलेजच्या परभणी येथे होणाऱ्या नॅशनल बेसबॉल स्पर्धा खुल्या गटासाठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी संघात निवड झालेल्या विद्यार्थिनी खेळाडूंचा सत्कार शिवसेना कार्यालय खर्डे कॉम्प्लेक्स येथे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व महिला जिल्हा संघटक सपना मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रमोद लबडे म्हणाले, ग्रामीण भागातील युवक युवतींमध्ये जन्मजात खिलाडूवृत्ती असते ती विकसित करण्याच्या दृष्टीने लबडे स्पोर्ट्स क्लब च्या माध्यमातून त्यांना आवश्यक त्या खेळांच्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने जागृत व प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे तसेच मुबंई शिवसेना युवासेना अकॅडमी यांची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना या विद्यार्थीनी खेळाडूंनी शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यामुळे आम्ही प्रभावित झालो असून आपल्याला संधी मिळाल्यास कोपरगाव व राहता तालुका येथील शिवसेना, युवासेना,अथवा युवती सेना या विभागात काम करण्यास तयार असल्याची इच्छा प्रगट केली.
यावेळी खेळाडू विद्यार्थिनींनी राहाता तालुका युवतीसेना उपआधिकारी ,नॅशनल कराटे चॅपियंन कु. नेहा कुलकर्णी, शिवसेना जिल्हासंघटक, सौ. सपना मोरे, शहर संघटक सौ. राखी विसपुते, यांचे हस्ते शिवबंधन बांधुन घेतले,
यावेळी सौ सपना मोरे यांनी सर्व होतकरू युवतींना भावी स्पर्धा मध्ये यशस्वी होऊन आपल्या कुटूंबाचा उत्कर्ष करावा अशा शुभेच्छा देऊन ,भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील युवक युवती च्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु असे सांगितले,
तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी विषेश करून पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे कौतुक करून ते एक धडाडीचे कट्टर निस्वार्थ जागृत , गरजु वंचित समाजाचे प्रश्नावर झोकून देणारे आमचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे सांगुन सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रमोद अण्णा लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, महिला जिल्हासंघटक सौ सपना मोरे, शहरसंघटक सौ. राखी विसपुते, माजी शहरप्रमुख अस्लम शेख, सनी वाघ,पुणतांबा शहरप्रमुख महेश कुलकर्णी, राहाता तालुका युवतीसेना उपआधिकारी कु. नेहा कुलकर्णी, पुणतांबा युवतीसेना शहरप्रमुख कु चेतना गुढेकर , दुर्गा आव्हाड, देवयानी लोहकरे, पुजा पवार, श्रुती जाधव, कोपरगाव शिवसेना , शिवतिर्थ , कार्यालय प्रमुख सोमनाथ भाऊ भोसले, इतर युवक युवती उपस्थित होते.
Post Views:
239