कोपरगाव गणेशोत्सवात वाजणार ‘डीजे’पण  नियमातच 

कोपरगाव गणेशोत्सवात वाजणार ‘डीजे’पण  नियमातच 

‘DJ’ will play in Kopargaon Ganeshotsav, but within the rules

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 25 Aug, 19.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगावचा गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा करण्याची इच्छा मनी बाळगणार्‍या गणेशभक्तांसह मंडळ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने यंदा खर्‍या अर्थाने बाप्पांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

मंगळवारी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे  झालेल्या डीजे  सिस्टीमवाले यांच्या विशेष बैठकीत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव  यांनी गणेश मंडळांना डीजे वाजवू शकतात, मात्र  त्यासाठी आवाजाच्या मर्यादा आणि वेळेचे बंधन पाळावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.

 गणेशोत्सवाची धूम  ढोलचा निनाद आणि डीजेचा दणदणाट सर्वत्र परिचित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डीजेवर बंधने आणली गेल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर कोरोना काळातील निर्बंधांमुळेही दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यावर मोठी बंधने आली होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यास मुभा दिल्याने  कोपरगावात  पोलीस यंत्रणेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गणेश मंडळांच्या अनेक मागण्यांचा सकारात्मक विचार केला जात असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होऊन तशा अटी-शर्थी ठेवून गणेश मंडळांना परवानग्या दिल्या जाणार आहेत. तसे संकेत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव  यांच्याकडून मंगळवारी (२३) रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आले. गणेश मंडळही  डीजे संबंधी नियमांचे पालन करतील असा विश्वास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी  व्यक्त केला.
त्यांच्या या  निर्णय, सूचनांचे  डीजे चालकांनी स्वागत केले.
फोटो ओळी ग्रामीण पश्चिम भागातील गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवाबाबत बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव
कोपरगाव ग्रामीण पोलीस  ( Kopargaon Police Station यांच्याकडून  गणेशोत्सवाच्या ( Ganesh Festival) पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील गावातील गणेश मंडळांची  ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोळपेवाडी आऊट पोस्ट येथे गुरुवारी (२५) रोजी सायंकाळी सहा वाजता बैठक पार पडली .
यावेळी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांनी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी गणेश मंडपामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे, जबरदस्तीने कोणाकडूनही वर्गणी मागू नये, गणेश मंडळाचे ठिकाणी दाखविण्यात येणारे देखावे हे आक्षेपार्ह अगर सामाजिक तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचे ठेवावे,गणेश मंडळाचे ठिकाणी स्वयंसेवक ठेवणे बाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांना सर्व विभागाच्या परवानगी घेणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात आली व सदर समस्या सोडवणे बाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. आहे असेही निरीक्षक जाधव यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page