नगरपालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर  वाचनालयास १०२ पुस्तकांची भेट

नगरपालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर  वाचनालयास १०२ पुस्तकांची भेट

Municipality Dr. Gift of 102 books to Babasaheb Ambedkar Library

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 26 Aug, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव  नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या वतीने नुकतीच १०२ पुस्तकांची भेट देण्यात आली आहे.

वाचनामुळे आपण ज्ञान संपादन , विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो.
सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पुस्तकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळते.
पुस्तके वाचनाने जगाबद्दल ज्ञान प्राप्त होवून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. वाचनाचा महिमा अनेक महान व्यक्तींनी सांगितला आहे. त्यामुळे सर्वाँना वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी  कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या वतीने   मुख्याधिकारी शांताराय गोसावी यांच्याकडे पुस्तक देण्यात आली आहे 

यावेळी धरमचंद बागरेचा, चंद्रशेखर म्हस्के,  रमेश गवळी, दिनकर खरे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, जावेद शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, आकाश डागा, रहेमान कुरेशी, अनिरुद्ध काळे, सागर लकारे, फिरोज पठाण, नगरपरिषद अभियंता रोहित सोनवणे, ग्रंथपाल महेश थोरात, मदतनीस सारिका राझे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page