कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीसह बैलांची मनोभावे पूजा

कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीसह बैलांची मनोभावे पूजा

In Kopargaon, bullfight is celebrated with enthusiasm, with traditional musical instruments procession and emotional worship of bulls

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 26 Aug, 20.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सातत्याने झालेल्या दमदार पाऊस व ढगाळ हवामान यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसामुळे, रोगराईमुळे झालेले नुकसान, उत्पादनात येणारी मोठी घट अशा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही आज शेतकाऱ्यांनी बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला. शहरामध्ये अनेकांनी आपल्या घरात मातीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलांची मनोभावे पूजा केली. १०० ते ५०० रुपयांपर्यंत आज कोपरगाव शहरात बैलजोडी विकण्यात येत होती.

कोपरगाव येथील श्रीमंत  पवार सरकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेस येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी मुख्याधिकारी शांताराम गोसावी आणि श्रीमंत पवार सरकार संस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,गोसेवक धनंजय जोशी यांचे उपस्थितीत सोमेश्वर महादेव देवस्थान येथे परंपरागत पध्दतीने अभिषेक पुजा आणि आरती संपन्न झाली.त्या नंतर वेशीचे पुजन करण्यात येवून पोळा फोडण्यात आला. वेशी जवळील ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेवून शेतकरी बैलजोडी सह सोमेश्वर महादेव देवस्थान येथे आले.तेथे श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने बैलजोडी पुजन सौ.संगिता व महेंद्र पाटील,व्यवस्थापक सौ.कावेरी कपोते व मनोज कपोते यांचे शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सोमेश्वर महादेव देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, गोसेवक धनंजय जोशी व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत विसपुते, महावीर शिंगी,अशोकराव आढाव, पौरोहित्य प्रविणशास्त्री मुळे,नंदू शेंडे गुरव,रमेश जंगम,निवृत्ती वाघमारे, मनोज विसपुते,सुधाकर जाधव,कैलास शिवाळ,कु.आदिती कपोते,किरण वडनेरे,विजय कासलीवाल,प्रदिप मते, श्रीम.लहानबाई नरोडे, श्रीम.अग्नीहोत्री बाई, श्रीम.कांताबाई शेंडे,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,विभाग प्रमुख मनोज लोट,संजय तिरसे,अरुण थोरात, ग्रंथपाल,महेश थोरात, बुचकुले,रविंद्र वाल्हेकर यांचे सह कोपरगाव नगरपरिषदे अधिकारी व कर्मचारी, सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त,ग्रामस्थ उपस्थित होते.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले होते त्यामुळे सर्व धार्मिक सणावर मर्यादा आली होती. परंतु यंदा सर्वच परिस्थिती बरी असल्याने सण उत्साहात साजरा करण्यात येतो
शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या मिरवणुका काढल्या. वाजतगाजत जनावरांना मारुती मंदिरापर्यंत आणण्यात आले. शहरामध्ये अनेकांनी हलकी, बॅन्जो, बॅण्ड, पिपाणी, तुतारी अशा पारंपरिक वाद्यांचा मिरवणुकीमध्ये वापर केला, तर काही जणांनी फटाके फोडून जोरदार मिरवणुका काढल्या.
    

Leave a Reply

You cannot copy content of this page