कोपरगाव ब्रिजलालनगर पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ

कोपरगाव ब्रिजलालनगर पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ

Commencement of work on Kopargaon Brijlalnagar Pipe Line

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 27 Aug, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका असणाऱ्या १३१.२४ कोटीच्या ५ नंबर साठवण तलाव वितरण योजनेत समाविष्ट असलेल्या कोपरगाव शहरातील ब्रजलालनगरच्या पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.

ना. आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोपरगाव शहरातील नवीन ५ नंबर साठवण तलावाच्या निर्मितीबरोबरच, ९५ किलोमीटरची नवीन पाईपलाईन, पाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगर, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर व मोहनीराज नगर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, बेट मोहनीराज नगर भागातील ९१ किमी पाईपलाईन आदी कामांचा या योजनेत समावेश आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणी पुरवठा कसा होईल यासाठी ना. आशुतोष काळे प्रयत्नशील असून त्या कामाचा एक भाग म्हणून ब्रिजलालनगरच्या पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र बोरावके,  सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, राजेंद्र फुलफगर, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, संदिप कपिले, धनंजय कहार, आकाश डागा, विक्रम मांढरे, विकास बेंद्रे, ठकाजी लासुरे, मनोज कडू, एकनाथ गंगूले, शंकर घोडेराव, भाऊसाहेब भाबड, सचिन गवारे, डॉ. आतिष काळे, योगेश नरोडे, कैलास मंजुळ, अंबादास वडांगळे, मनोज नरोडे, गणेश बोरुडे, उमेश दिक्षित, विलास पाटोळे, बाळासाहेब शिंदे, अय्युब कच्छी, जुनेद शेख, आकाश गायकवाड, नारायण लांडगे, गणेश जाधव, किरण बागुल, किशोर बागुल, मंदार हिंगे, दत्तात्रय ठोंबरे, नाना बोरावके, मनिष फुलफगर, गोरख लोहकणे, संजय सुपेकर,  राहुल वाघ, महेश पवार, संजय भावसार, अविनाश पिसे, ढेपले सर, साहिल बोरावके, चैतन्य बोरावके, रिजवान शेख आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.  

Leave a Reply

You cannot copy content of this page