Entrepreneur’s Day : केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि संजीवनी शैक्षणिक च्या मार्गदर्शनातुन  उद्योजक बना-  सुमित कोल्हे

Entrepreneur’s Day : केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि संजीवनी शैक्षणिक च्या मार्गदर्शनातुन  उद्योजक बना-  सुमित कोल्हे

  Entrepreneur’s Day: Become an entrepreneur with the guidance of central and state government schemes and Sanjeevani Education – Sumit Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 28 Aug, 10.00am
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि संजीवनी शैक्षणिक संकुलाचे सहकार्य व मार्गदर्शनातुन नोक-या देणारे उद्योजक बना असे  आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी  जागतिक उद्योजक दिनी संजीवनी सिनिअर  कॉलेजात  केले. यावेळी यशस्वी उद्योजक झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी विद्यार्थ्यांसह  शिक्षक  व  कापसे पैठणीचे संचालक  दिलीप बाळासाहेब खोकले, प्राचार्य डाॅ. एस.बी. दहिकर व सर्व विभाग प्रमुख  उपस्थित होते.
             
 सुमित कोल्हे पुढे म्हणाले ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक व्हावे अशी तीव्र इच्छा कै. शंकरराव  कोल्हे यांची  असायची. त्यासाठी ते सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन  करायचे. आजही तोच वारसा  अध्यक्ष  नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे पुढे नेत आहेत. संजीवनी इंजिनिअरींग  व पाॅलीटेक्निकचे माजी विद्यार्थी हे देश  परदेशात  यशस्वी उद्योजक म्हणुन कार्यरत आहेत, ही बाब संजीवनीच्या दृष्टीने  भूषणावह आहे.
             यावेळी  दिलीप कापसे म्हणाले की स्टार्ट अप आणि प्रत्येक व्यवसायाच्या उभारणीसाठी दृढ निश्चय , संयम आणि सातत्य या बाबी महत्वाच्या भुमिका बजावतात. याचवेळी एक संवादात्मक सत्र देखिल आयोजीत करण्यात आले. ज्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी  त्यांचा आत्मविश्वास , संघर्ष  आणि अंतिम यशाचा प्रवास हा सध्याच्या विद्यार्थ्यांना  सांगीतला आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना  प्रेरणा दिली.
 प्रा. डाॅ. सरीता भुतडा, प्रा. मुक्ता शिंदे , प्रा. योगेश  गाढवे, प्रा. वाय.पी. शिंदे , प्रा. विशाल  निंबोळकर, यांचे कार्यक्रमासाठी  विशेष  सहकार्य लाभले. सुत्रसंचलन प्रा. रचना नगरकर यांनी केले तर प्रा. लिना मंटाला यांनी आभार मानले.
           

Leave a Reply

You cannot copy content of this page