वार्षिक सर्वसाधारण सभा: डॉ. शरद पवार पतसंस्था  आर्थिक बळकटच – ना. काळे

वार्षिक सर्वसाधारण सभा: डॉ. शरद पवार पतसंस्था  आर्थिक बळकटच – ना. काळे 

Annual General Meeting: Dr. Sharad Pawar Credit Union Financially Strong – No the black

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 28 Aug, 17.00

By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सहकारी संस्थात  आर्थिक शिस्त जपून संस्थेशी निगडीत घटकांचे हित जोपासण्याची शिकवण कर्मवीर शंकरराव काळे यांनी दिली  त्यांच्या आदर्श विचारांवर माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण डॉ. शरद पवार पतसंस्थेने दिलेला पंधरा टक्के लाभांश हा  संस्थेची आर्थिक बळकटी अधोरेखित करीत  असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा  संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पतसंस्थेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले . अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे होते.

ना. काळे पुढे म्हणाले की,  कोरोनाचे आव्हानांना तोंड देत डॉ. शरद पवार  पतसंस्थेने सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली हि अभिमानास्पद बाब आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी पतसंस्था आधारवड बनली आहे. संस्थेने संपादन केलेल्या विश्वासाच्या बळावर ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून नियमित व वेळेवर कर्ज पुरवठा करणे व त्याची नियमित कर्ज वसुली करणे,ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी मागणी प्रमाणे तत्काळ परत करीत आहे त्यामुळे संस्थेच्या ठेवीत सातत्याने वाढ होत आहे. यावरून संस्थेवर कर्जदार, ठेवीदार यांचा दृढविश्वास असल्याचे सिद्ध होत आहे. यापुढील काळातही संस्थेने असाच नियोजनबध्द कारभार करून संस्थेची आर्थिक भरभराट साधावी असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.
संस्थेच्या ठेवी  आज अखेर ३६ कोटी आहेत. कर्ज वाटप  २३ कोटी ३२ लाख  आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.९२% आहे.संस्थेचा ढोबळ एन.पी.ए. १३.३७% असून संस्थेने एन.पी.ए. तरतूद रुपये ६ कोटी ६५ लाख ५० हजारांची केली आहे. १००% एन.पी.ए.ची तरतूद केल्यामुळे निव्वळ एन.पी.ए. ० % आहे. सहकार कायद्यानुसार २२ कोटी ३९ लाखाची गुंतवणूक केली असून लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून ७३ लाख ५९ हजार रुपयांचा नफा झाला याबद्दल ना आशुतोष काळे यांनी  पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे कौतुक केले.
        आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव व्हा.चेअरमन सोपानराव गुडघे यांनी मांडला. अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर काळे बी. डी. यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष बढे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन सोपानराव गुडघे यांनी मानले. यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, अरुण चंद्रे, सोमनाथ घुमरे, बाबुराव कोल्हे, सोमनाथ कांगणे, नानासाहेब चौधरी, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते, कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             

Leave a Reply

You cannot copy content of this page