नेतृत्वाच्या संधीमुळे समताचे विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक बनतील – विजय बोरुडे
Samat students will become informed citizens of the country due to leadership opportunities – Vijay Borude
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 28 Aug, 17.10
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव समताचा विद्यार्थी उद्या सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक, राजकीय,सहकार क्षेत्रात विविध समित्यांवर नेतृत्व करण्याच्या संधीमुळे समताचे विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक बनतील असा विश्वास तहसीलदार विजय बोरुडे यांनी विद्यार्थ्यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यात व्यक्त केला अध्यक्षस्थानी समता स्कूलचे संस्थापक काका कोयटे होते.
काका कोयटे म्हणाले , विद्यार्थ्यांच्या अंगी लोकशाही मूल्यांची रुजवण व्हावी यासाठी स्कूल अंतर्गत विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या विजयी उमेदवारांना तहसीलदार विजय बोरुडे व सिमरन खुबानी यांनी संस्थापक काका कोयटे व मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांच्या उपस्थितीत शपथ दिली.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी इ.९ वी तील अजिंक्य वठोरे याची मुलांमध्ये तर मुलींमध्ये अनुष्का ठोळे हिची मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
रुपल पाटील, शार्विल शिरोडे, मदनलाल लोंगणी, जिया बोथरा, भावेश अग्रवाल, आरुष सोनी, साई तनपुरे, यश दिवेकर तर इ.८ वी तील राजवीर आढाव, नूतन लाहोटी, दर्शिल अजमेरे, अदिती सोनवणे, अन्वी उंबरकर, अर्निशा कोठारी, मुक्ता मुंजे, आर्यन कुमार, प्रथमेश भट्टड, गिरिजा निर्मळ, ईश्वरी गोडसे, स्नेहा गुजराणी यांची विविध समित्यांवर निवड करण्यात आली.
प्रास्ताविक व परिचय उपप्राचार्य समीर आत्तार यांनी करून दिला. विजय बोरुडे यांचा सत्कार काका कोयटे यांनी केला, तर सौ सिमरन खुबाणी यांचा सत्कार सौ.स्वाती कोयटे यांनी केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.शोभा गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्का जपे व वृष्टी कोठारी यांनी केले.
कार्यक्रमासाठी क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षिका सौ.चैताली पटारे यांनी मानले.
Post Views:
252