कोपरगाव ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या – ना.आशुतोष काळे
Speed up the work of Kopargaon No. 5 storage tank – No. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 30 Aug, 19.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित स्वच्छ पाणी मिळावे यासाठी १३१.२४ कोटी रुपये निधीतील ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थान अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी तलावाच्या कामाच्या पाहणी प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सुरू असलेल्या कामाची महिती घेतली.
यावेळी ना.आशुतोष म्हणाले की,५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती कमी आहे त्यामुळे सामूहिक प्रयत्न करून साठवण तलावाच्या कामाला गती द्या, यासाठी सर्व प्रशासकीय अधिकऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे. अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगरपरिषद अभियंता सुनील ताजणे, मानवसेवा कन्स्ट्रक्शनचे विवेक पाटील, पाटबंधारे विभागाचे मिसाळ, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे महेश मुंगेरीया, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव,अजीज शेख, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, चांदभाई पठाण, सचिन गवारे, राजेंद्र आभाळे, महेश उदावंत, किरण बागुल, विलास पाटोळे, विजय शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
231