कोपरगाव पोलीस स्टेशनला गणेश उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न..!

कोपरगाव पोलीस स्टेशनला गणेश उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न..!

Peace committee meeting concluded at Kopargaon police station on the occasion of Ganesh festival..!

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 30 Aug, 19.50
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : येथील पोलीस स्टेशनच्या आवारात कोपरगाव शहरातील  गणेश मंडळ पदाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत गणेश उत्सवानिमित्त शांतता समिती बैठक सोमवारी (२९) रोजी घेण्यात आली.सदर बैठक पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.

यावेळी नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी,  नायब तहसीलदार पी. डी. पवार, वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता अतुल खंडारे,  तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे, झेडपी सदस्य राजेश परजणे, फादर प्रमोद बोधक, नारायण अग्रवाल, प्राध्यापक संतोष पगारे, असलम शेख, बाळासाहेब रुईकर, अनिल गायकवाड, संतोष गंगवाल, भरत मोरे, विजय आढाव, फ्रडी जोसेफ फर्नांडिस, बापु काकडे या ६० ते ७० गणेश मंडळ पदाधिकारी अध्यक्ष व सदस्य तसेच महिलाधक्ष समितीच्या विमल खांबेकर जोत्स्ना पगारे, तसनीम आयुब पठाण,   ॲड. प्रेरणा पाटणी, स्वाती मुळे, डॉ. अर्चना मुरूमकर, पोलीस पाटील पोलीस अधिकारी व सर्व अंमलदार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ह्यावेळी शहरात  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रथम पोलीस स्टेशन ला मंडळाची नोंदणी आवश्यक आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपस्थित मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मंडळाची आरास करतांना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाहीत असे देखावे तयार करू नयेत, व्यक्तीद्वेष वैयक्तिक भावना दुखावल्या जातील असे ही देखावे सादर केले जावु नये. पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा वापर करावा पर्यावरण पूरक देखावे व विचारातून प्रबोधन करावे जातीय सलोखा, देशप्रेम, समाजप्रबोधनात्मक, एकतेचे दर्शन असे देखावे सादर करावे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, स्वातंत्र्य चळवळ देखावे,  रक्तदान शिबि,  वैद्यकीय सेवा शिबि,  शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्य, पारंपारिक व सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक खेळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात.  ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव साजरा करावा याबाबत सूचना व मार्गदर्शन केले.
नगरपालिका व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना विविध प्रकारची पाच  बक्षीसे देण्यात येतील असेही त्यांनी घोषित केले.  
सदर शांतता कमिटी व गणेश उत्सव मंडळाची बैठक पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे आदेशाने  कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी बैठक आयोजित केली होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page