कोपरगावला ना.आशुतोष काळेंच्या रूपाने  कर्तबगार लोकप्रतिनिधी लाभला –  सौ.अलका कुबल -आठल्ये

कोपरगावला ना.आशुतोष काळेंच्या रूपाने  कर्तबगार लोकप्रतिनिधी लाभला –  सौ.अलका कुबल -आठल्ये

Kopargaon got an accomplished public representative in the form of Mr. Ashutosh Kalen – Mrs. Alka Kubal – Athlye

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun4 Sep, 17.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : अभिनय क्षेत्रात काम करीत असतांना ग्रामी भागात महिला वर्गासाठी अतिशय महत्वाची पिण्याच्या पाण्याची समस्या  किती ज्वलंत असते व त्यासाठी महिलांना किती त्रास सहन करावा लागतो याची एक महिला म्हणून कल्पना आहे. तो प्रश्न सोडविला असा   महीलांप्रती अतिशय संवेदनशील असणारा कर्तबगार लोकप्रतिनिधी कोपरगाव तालुक्याला लाभला असल्याचे गौरोद्गार  सिनेअभिनेत्री सौ.अलका कुबल -आठल्ये काढले यांनी काढले.

 ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते कोळपेवाडी १६.७५ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे  भूमिपूजन सिनेअभिनेत्री सौ.अलका कुबल -आठल्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत
केले. अध्यक्षस्थानी कचरू कोळपे होते.
यावेळी बोलताना ना आशुतोष काळे म्हणाले कोळपेवाडी गावाचा  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी तब्बल १६.७५ कोटी निधी देवून महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला याचे आत्मिक समाधान सरकार बदलले तरी निधीचा ओघ सुरूच राहील अशी ग्वाही दिली. 
यावेळी व्यासपीठावर सौ.चैताली काळे, कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, कारखान्याचे संचालक व कोळपेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सूर्यभान कोळपे, उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सौ.अलका कुबल-आठल्ये पुढे म्हणाल्या की,कोविडमध्ये नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवून विकास कामे  करून आशुतोष नामदार आशुतोष काळे यांनी परिवाराचा  समर्थपणे पुढे चालवित आहे.  महिलांनी आयुष्यभर चारित्र्य जपावे.अभिनय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामातून व चारित्र्य जपले त्यामुळे आदर्श मुलगी,आदर्श पत्नी आणि आदर्श आई होवू शकले.त्यामुळे  नेहमीच मानसन्मान मिळेल असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना ना.आशुतोष काळे म्हणाले की,  सरकार कोणतेही असो सार्वजनिक विकास कामांना निधी मिळण्यात कधीच अडचण येत नाही. मागील अडीच वर्षात मतदार संघातील जवळपास ६० पेक्षा जास्त गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत २६० कोटी पेक्षा जास्त निधी आणला आहे.व यापुढील काळात देखील उर्वरित गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून भरघोस निधी आणणार असल्याचे ठामपणे सांगितले. 
याप्रसंगी संभाजीराव काळे,  अर्जुनराव काळे,  राधु कोळपे, शिवाजीराव वाबळे,  सौ. वैशाली आभाळे,  डॉ. प्रकाश कोळपे,  मच्छिन्द्र हाळनोर, सौ. मीनल गवळी,  प्रशांत कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सूर्यभान कोळपे यांनी केले.सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण व सौ.भाग्यश्री पिंगळे यांनी केले तर आभार  डॉ.प्रकाश कोळपे यांनी मानले.
   
         

Leave a Reply

You cannot copy content of this page