कर्मवीर शंकरराव काळे कारखाना  मिल रोलरचे पूजन 

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना  मिल रोलरचे पूजन 

 Worship of Karmaveer Shankarao Kale Factory Mill Roller              

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun4 Sep, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे  कारखान्याच्या २०२२-२३ या ६८ व्या गळीत हंगामाच्या  दृष्टीने नवीन मिल रोलरचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलतांना  आ.आशुतोष काळे म्हणाले की, मागील गळीत हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदविलेल्या सर्व ऊसाचे गाळप करून मागील वर्षीचा उंचाकी गळीत हंगाम यशस्वी करून कारखान्याची ६८ व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील आधुनुकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षीच्या गाळप हंगामाची तयारी नवीन मिलचे रोलर पूजनाने करण्यात आली आहे.  मागील दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे व भविष्यात देखील यामध्ये वाढ होवू शकते. त्यादृष्टीने  कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील काम चालू वर्षी मुदतीच्या आत पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी दुसऱ्या टप्यातील कामास प्रारंभ होवून आधुनिकीकरणाचे सर्व काम पूर्ण झाल्यावर अतिरिक्त सर्व ऊसाचे वेळेत गाळप होण्यास मोठी मदत होणार असल्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

      

याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे,  प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ,सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे,शिवाजीराव घुले,दिनार कुदळे,सुरेश जाधव, विष्णू शिंदे, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, फॅक्टरी मॅनेजर दौलतराव चव्हाण,चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनजर सोमनाथ बोरनारे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

   

Leave a Reply

You cannot copy content of this page