केंद्राच्या पंतप्रधान आवास योजना, व जलजीवन मिशनचे श्रेय लाटण्याचा आमदाराचा प्रयत्न – विवेक कोल्हे
MLA’s attempt to discredit Centre’s Pradhan Mantri Awas Yojana, and Jaljeevan Mission – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 13 Sep, 19.30 pm
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : पंतप्रधान आवास योजना, व जलजीवन मिशन या दोन्हीही केंद्र सरकारच्या योजना आहेत या केंद्र सरकारच्या योजनाद्वारे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी घरकुल व पाणीपुरवठा योजनांची कामे केंद्र सरकारच्या निधीतून पूर्ण झालेली आहेत. मात्र या कामांचे श्रेय स्थानिक आमदार लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका आ. आशुतोष काळे यांचे नाव न घेता संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी एका कार्यक्रमात केली .
विवेक कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत, जलजीवन मिशन यासारख्या अनेक लोककल्याणासाठी योजना सुरू केलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ७१ ग्रामपंचायतींना २७७ कोटींचा निधी या खात्याचे राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. केंद्र सरकारच्या या निधीतूनच या ७१ गावांतील पाणीपुरवठा योजनांचे काम झाले आहे. ‘पंतप्रधान आवास योजने’ च्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील अनेक गरजू लोकांना घरे मिळाली. ही वस्तुस्थिती आहे मात्र स्थानिक आमदार याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चौकट
केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांचे व्यक्तिमत्व बिग बी अमिताभ बच्चन यांचेसारखे असून त्यांची या वयातील कामातील कुशलता व तडफ तरुणांना लाजविणारी असून निश्चित तरुणांसाठी आदर्शवत आहे. – विवेक कोल्हे
Post Views:
184