कोपरगाव तहसीलदार दालनात विवेक कोल्हे यांची आढावा बैठक 

कोपरगाव तहसीलदार दालनात विवेक कोल्हे यांची आढावा बैठक 

Review meeting of Vivek Kolhe in Kopargaon Tehsildar Hall

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 13 Sep, 19.40 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव :   कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील विविध विविध प्रश्नावर दिलेल्या निवेदनावर कोणती कारवाई झाली याचा आढाव घेण्यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष  विवेक कोल्हे यांनी  तहसीलदार विजय बोरुडे यांच्या दालनात सोमवारी आढावा बैठक   घेतली.

  याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. 
   यावेळी विवेक कोल्हे यांनी तहसीलदार  बोरुडे यांच्यासमोर  कोपरगांव शहरासह विधानसभा मतदार संघातील रहिवासीयांना भेडसावणा-या मुलभूत समस्यांचे निवारण व्हावे, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र अपात्र ड यादीतील घरकुल लाभार्थ्यांना तसेच शासकीय स्तरावरील विविध योजनांचा लाभ तळागाळातील उपेक्षीतांना मिळावा, त्याचप्रमाणे नव्यांने व दुबार शिधापत्रिका मिळाव्यात, शेतक-यांकडे मोठया प्रमाणात पशुधन  लम्पीचे लसीकरण पुर्ण क्षमतेने व्हावे,  गावांना ग्रामसेवक व तलाठी उपस्थित रहात नाहीत, आपेगांव पिण्यांच्या पाणी योजनेसाठी जमिन, कोकमठाण सडे शिंगवे रस्त्याच्या कामासाठी चार महिन्यांपासुन खडी येवुन पडली असुन त्याचे काम मार्गी लागावे, धोत्रे तळेगांव, घोयेगांव रस्त्याच्या वेडया बाभळीं काढाव्या, उक्कडगांव ग्रामपंचायत चौदावा व पंधराव्या वित्त आयोगातील विकास कामे मार्गी लागावी, उक्कडगांव जलजीवन मिशन अंतर्गत पाईप लाईनची वर्क ऑर्डर, १४० खातेदारांचे निधीचे प्रस्ताव, धोत्रे तळेगांव शिवरस्ता अतिक्रमण, पाचवस्ती व शेती रस्याचे काम, कालींदीनगर ड्रेनेज काम, वीज व शेती पाटपाणी संदर्भात उदभवणा-या अडचणी, कोविड मयतांच्या वारसांना शासन वैद्यकीय मदत, काकडी गांव अंतर्गत व काकडी विमानतळ प्राधिकरणांची थकीत पटटी तर बहादरपुर चोंडी वस्ती रस्त्याचे अतिक्रमण काढुन प्रलंबित विकास कामे मार्गी लागावी आदी प्रश्नावर विवेक कोल्हे यांनी चर्चा केली ही सर्व कामे तात्काळ मार्गीलावण्याचे आश्वासन तहसिलदार विजय बोरूडे यांनी दिले.
          याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, कैलास रावण राहणे, रिपाई राज्य सचिव दिपकराव गायकवाड, पढेगांवचे सरपंच प्रकाश किसन भाकरे, अशोकराव गवारे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सतिष केकाण, कुंभारीचे सुनिल ज्ञानदेव कदम, ज्ञानदेव गजानन कदम, किसनराव गव्हाळे, पुंजाराम शिंदे, बबनराव साळुंके, अशोक गव्हाणे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page