कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या सहकार्याने  महिलांना शिवणकाम प्रक्षिक्षण 

कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या सहकार्याने  महिलांना शिवणकाम प्रक्षिक्षण 

In collaboration with Kopargaon Shiv Sena Mahila Aghadi, sewing training for women

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 14 Sep, 19.10 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव शहर शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकार व सहकार्याने  येथील महिलांना तीन महिन्याचे शिवणकाम प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती उपशहर प्रमुख अश्विनी होने यांनी दिली.

यावेळी बोलताना अश्विनी होने म्हणाल्या,   कोरोनामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबे  आर्थिक संकटात सापडले आहेत अनेकांचे रोजगार गेले आहेत  अशा परिस्थितीत  संसाराला हातभार लावण्यासाठी  व रोजगार उपलब्ध व्हावा या पुढाकारातून  अश्विनी होने यांनी  सामान्य कुटुंबातील महिलांना  अत्यंत अल्प दरात तीन महिने शिवणकाम प्रशिक्षण  दिले आहे. प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला आहे. आहे. यात कल्पना सोनवणे, सोनिया साबळे, वैशाली साबळे, शुभांगी धिवर,सुजाता साळवे, नंदा साळवे,सत्यभामा साळवे,सुरेखा पाठक,मनीषा जिरे आदि महिलांना या  प्रशिक्षण मिळाले आहे. पडाळकर सर यांनी महिलांना प्रशिक्षण दिले आहे.
तीन महिन्याच्या या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा शिवणकाम व्यवसाय करता येणार असून त्यामुळे त्यांच्या संसाराला चांगलाच हातभार लागणार आहे असेही सौ होने म्हणाल्या,
या कामी आपल्याला जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन सदस्य  विशाल झावरे व शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांचे सहकार्य  मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 
       

Leave a Reply

You cannot copy content of this page