१० लाखाच्या खंडणीसाठी दोन जणांचे अपहरण,
चौघांना अटक, एक दिवसाची पोलिस कोठडी
१० लाख द्या, नाहीतर सचिन आत्महत्या करेल !
वृत्तवेध ऑनलाइन 19 जुलै 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : अपहरण झालेल्या दोघांची ४७ तासांत सुटका करताना या प्रकरणातील चार आरोपींना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले. संबंधित प्रकरणात १० लाखांच्या खंडणीसाठी दोघांचे अपहरण करण्यात आले होते.
कोपरगाव येथील श्रीकृष्ण बबनराव पवार व अक्रम शफिओददीन शेख या दोघांचे शुक्रवारी दुपारी अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी सचिन राजेंद्र कुसुंदर, सचिन संजय साळवे, आकाश विजय डाके,शुभम केशव राखपसारे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.
या प्रकरणाबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , गांधी पुतळा परिसरातील बाल गणेश किड्स वेअरचे मालक व दुकानात कामाला असलेल्या कामगाराचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार एम एच १२ एन बी २४८२ या कार मधून वरील आरोपींनी कृष्णा पवार व शाफिक उद्दीन शेख यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना शिर्डी येथील हॉटेलमध्ये दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली फिाा चा मुलगा अनिल पवार याचे मोबाईल वर फोन करुन अर्जट सचिन सावजी याचे घरी १० लाख रुपये पोहच कर तु जर पैसे दिले नाही तर सचिन आत्महत्या करील असे बोलण्यास भाग पाडले.
बबनराव बाळाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदरचा कोपरगाव शहर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपहरण प्रकरणातील चौघांना न्यायालयासमोर हजर केले, असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बोरसे पुढील तपास करीत आहे.