इशारा देताच टोल कंपनीकडून दखल; कामाचा शुभारंभ – सुमित कोल्हे

इशारा देताच टोल कंपनीकडून दखल; कामाचा शुभारंभ – सुमित कोल्हे

फक्त आणि फक्त वडाची झाडे लावा, व शंभर वर्षापूर्वीचे वैभव प्राप्त करून द्या,

वृत्तवेध ऑनलाइन 19 July  2020

By: Rajendra Salkar 

कोपरगाव : नगर -मनमाड महामार्गावरील साईबाबा काॅर्नर ते टाकळी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी दिला होता. इशारा देताच टोल कंपनीकडून दखल, नगर -मनमाड गतिरोधक कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या महामार्गावर साईबाबा काॅर्नर ते टाकळी फाटा परिसरात वर्षभरात लागोपाठ झालेल्या अपघातात काही जणांना जीव गमावावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. गतिरोधक आणि सूचना फलक नसल्याने अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अनेकदा मागणी आणि आंदोलन करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. महामार्गावरील गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात येतील, अशी व्यवस्था करावी, दोनशे मीटर अलिकडे सूचना फलक लावण्यात यावा, गतिरोधकावर रंगाचे पट्टे ओढणे, कॅटाईट रिफ्लेक्टर टाकणे, रस्ता दुभाजकांवर रेडीयम प्लेटस् लावणे  अशी मागणी निवेदनाद्वारे सुमित कोल्हे यांनी केली होती. या निवेदनाची दखल घेत टोल कंपनीने साईबाबा काॅर्नर ते टाकळी फाटा दरम्याने गतिरोधक कामाचा शुभारंभ टाकळी फाटा येथून सुमित कोल्हे यांच्या हस्ते टोल कंपनीचे अधिकारी मोहम्मद शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडे

चौकट
नगर मनमाड रस्ता रुंदीकरणात शंभर वर्षापासून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडांची मोठी कत्तल झाली. त्यामुळे हा रस्ता ओकाबोका झाला या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची परवानगी व संधी संजीवनी फाउंडेशन  ला मिळाली आहे. तेव्हा त्यांनी याठिकाणी फक्त आणि फक्त वडाची झाडे लावून या रस्त्याला पुन्हा शंभर वर्षापूर्वीचे वडाच्या झाडांचे वैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नगर-मनमाड महामार्गावरील पाणी वसाहतीमध्ये साचले

कालीका नगर, फडके प्लाॅट व शारदा नगर येथिल येथील रहिवासी घरामध्ये महामार्गाचे पाणी साचत असल्यामुळे साथीच्या रोगाचे रोगाचा फैलाव होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो अशी तक्रार सुमित कोल्हे यांच्याकडे केली, टोल कंपनीचे प्रतिनिधी शेख यांना साईड ड्रेनेज बाबत विचारले असता त्यांनी ते म्हणाले नगरपालीकेचा ना हरकत दाखला मिळाला तर आम्ही ड्रेनेजचे काम करून देवु असे सांगीतले. नाहरकत देण्यास काय अडचण आहे असे सुमित कोल्हे यांनी नगरपालिका अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे विचारले त्यावर चाकणे यांनी टोल कंपनीने परवानगी मागितली नसल्याचा गौप्यस्फोट केला. हा विसंवाद लक्षात येताच सुमीत कोल्हे यांनी थेट मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याशी संपर्क साधला. यावर श्री सरोदे यांनी सोमवारी, परीसरातील नगरसेवक यांचे समवेत चर्चा करून ड्रेनेज चा प्रश्न सोडवु असे सागीतले.

साईबाबा काॅर्नर ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या दुतर्फा ‘झाडे लावा आणि जगवा’ याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संजीवनी फाउंडेशनला परवानगी मिळाली असून नगर-मनमाड महामार्गावर टाकळी फाटा ते साईबाबा कॉर्नर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावण्यासाठी टोल कंपनीकडून जाग्यावरच परवानगी मिळाली असल्याची माहिती सुमित कोल्हे यांनी दिली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदिप नवले, माजी सभापती सुनिल देवकर,विवेक सोनवणे, परीसरातील नागरीक तुषार जमधडे, भागवत उकिर्डे, प्रदिप चांदर, कैलास सोमासे, संदीप कुलकर्णी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page