कोपरगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे वीज  वितरण व पालिका प्रशासनाला निवेदन

कोपरगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे वीज  वितरण व पालिका प्रशासनाला निवेदन

Kopargaon Shiv Sena Mahila Aghadi’s statement to electricity distribution and municipal administration

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 14 Sep, 19.20 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सप्तर्षी मळा प्रभाग क्रमांक चार येथे जादा क्षमतेचे नवीन रोहित बसवा तसेच नगरपालिकेने अवास्तव करवाढ केलेली घरपट्टी कमी करावी अशा वेगवेगळ्या मागणीचे निवेदन बुधवारी शिवसेना महिला आघाडी तर्फे वीज वितरण कंपनी व नगरपालिका प्रशासन यांना देण्यात आले आहे.

  शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख  सपना मोरे  तालुका प्रमुख सारीका कुहिले, शहर प्रमुख राखी विसपुते  या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास, रस्त्यावर उतरुन  शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही दिला.
कोरोना संकट व आर्थिक अडचण असताना पालिकेने चुकीच्या सर्वेक्षणानुसार अचानक चौपट घरपट्टीच्या नोटिसा नागरिकांना पाठविल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे या अवास्तव घरपट्टीमुळे नागरिकात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे तसेच सप्तर्षिमळा प्रभाग क्रमांक चार मध्ये निवासी क्षेत्र व्यापारी संकुल हॉस्पिटल वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज जोडण्या वाढल्यामुळे जुन्या रोहित्रावर लोड येऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे वाढती जोडणी लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीने नवीन रोहित्र बसवावे अशी मागणी कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वीज वितरण कंपनी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे  सदर निवेदन  नगरपालिका अधिकारी व वीज वितरण कंपनी अधिकारी यांना  महिला आघाडीच्या  जिल्हाप्रमुख सपना मोरे, तालुका प्रमुख सारीका कुहिले, शहर प्रमुख राखी विसपुते यांच्या हस्ते देण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page