स्त्रियांना तिच्यातील शक्ती ओळखता आली पाहिजे- रेणुका कोल्हे
स्त्रियांना मानसिक बळ देण्याचे काम स्नेहलता कोल्हे यांनी केले.
वृत्तवेध ऑनलाईन 20 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : चुल आणि मूल एवढेच स्त्रीचे विश्व नाही तर, प्रत्येक स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती असून, ती काहीही करू शकते; पण ती शक्ती तिला ओळखता आली पाहिजे आणि आपण कोणतेही काम करू शकतो, अशी जिद्द तिच्यात हवी, असे प्रतिपादन संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका कोल्हे यांनी केले.
त्यांच्या कार्याला मानसिक बळ देण्याचे काम माजी आ.तथा भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले, असे त्या म्हणाल्या,
साई संजीवणी शिंगणापूर महिला बचत गटाच्या इस्टंट ढोकळा पीठाची निमिर्ती व विक्री शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
रेणुका कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील स्त्रियांना
संघटीत करून त्यांच्यातील स्वत्वाची जाणीव करुन दिल्याने ख-या अर्थाने त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराचे धाडस निर्माण झाले, त्यातून त्यांची मोठया प्रमाणात आर्थीक प्रगती झाली. असेही त्या म्हणाल्या,
यावेळी साई संजीवनी गटाच्या सौ. अपर्णा जाधव आणि सौ. छाया आदमने यांनी माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे आणखी एक नवीन व्यवसाय सुरू करण्यात यश आले, याचा शुभारंभ रेणुका कोल्हे यांच्या असते त्यांच्या वाढदिवशी होत असल्याचा एक वेगळाच अभिमान आम्हाला वाटतो अशा भावना व्यक्त केल्या .