घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रमोद दरपेल, तर घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत राजश्री सोनवणे प्रथम
Pramod Darpel in the Home Ganapati Decoration Competition, while Rajshree Sonwane stood first in the Gouri Home Ganapati Decoration Competition.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 16 Sep, 15.30 pm
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार, भाजपच्या प्रदेश सचिव आणि संजीवनी महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा स्नेहलता कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट आणि घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रमोद शरदराव दरपेल यांनी तर घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत राजश्री स्वप्नील सोनवणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव आणि गौरी (महालक्ष्मी) सण घरोघरी उत्साहात साजरा झाला. गणेशोत्सव आणि गौरी सणानिमित्त नागरिक उत्कृष्ट आरास (सजावट) करतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट आणि घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी घरगुती गणपती आणि गौरीसमोर आकर्षक सजावट करून त्याचे फोटो आयोजकांनी दिलेल्या व्हॉटसअॅप नंबरवर पाठवले होते. त्याचे तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले आणि सर्वोत्कृष्ट सजावट केलेल्या स्पर्धकांची निवड करून निकाल घोषित करण्यात आले. घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रमोद शरदराव दरपेल (भगवती भोजनालय, कहार गल्ली, कोपरगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी देशभक्तीची थीम वापरून आकर्षक सजावट केली होती. पर्यावरणपूरक सजावट केलेल्या अर्चना निलेश मुंदडा (कोपरगाव) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. वासंती हेमंत गोंजारे (कमलकुंज निवास, येवला रोड, कोपरगाव) यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे त्यांनी पंढरीची वारी हा देखावा साकारत गणपतीसमोर आकर्षक आरास केली होती. घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत राजश्री स्वप्रील सोनवणे (गोरक्षनाथ कॉलनी, बाजारतळ, कोपरगाव) हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरते आहेत, तर सलोखा बाळकृष्ण दोडे (ब्राह्मणगाव) यांनी द्वितीय आणि सुजाता मनोहर शिंदे (वृंदावननगर, साई सिटी, खडकी रोड, कोपरगाव) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजप प्रदेश सचिव तथा संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्नेहलता कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये तर घरगुती गणपती सजावट स्पर्धेसाठी ११ हजार रुपयांचे प्रथम, ७ हजार रुपयांचे द्वितीय आणि ५ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्व विजेत्या स्पर्धकांना आयोजकांमार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात येईल अशी आयोजकांनी माहिती दिली.
Post Views:
280