कोपरगावच्या ज्येष्ठ समाजसेविका कमलाबाई ठोळे यांचे निधन

कोपरगावच्या ज्येष्ठ समाजसेविका कमलाबाई ठोळे यांचे निधन

Kamlabai Thole, Senior Social Worker from Kopargaon, Passes Away

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,May 4 Mon.15.30 Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव, :येथील सकल दिगंबर जैन समाजाच्या ज्येष्ठ सदस्या तथा समाजाभिमुख कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या कमलाबाई भागचंद ठोळे (वय ९३) यांचे निधन झाले.

त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या असून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असत. एकत्र कुटुंब पद्धतीचे जतन आणि संस्कारांची परंपरा जपण्यात त्यांचा विशेष सहभाग होता. आजच्या बदलत्या काळातही त्यांनी एकत्र कुटुंब व्यवस्था जपून आदर्श निर्माण केला होता.

कोपरगाव ज्येष्ठ नागरिक महिला मंचाच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी पुढाकार राहिला.

महाराष्ट्र स्टेट फर्टिलायझर अँड पेस्टीसाईड असोसिएशन (माफदा)चे माजी अध्यक्ष तथा कोपरगाव पीपल्स को-ऑप बँकेचे माजी चेअरमन कैलासचंद्र ठोळे, तसेच सोना पॉली प्लास्ट प्रा. लि.चे संचालक प्रकाश ठोळे यांच्या त्या मातोश्री होत. तसेच मुनिश ठोळे यांच्या त्या मोठ्या आई होत.कोपरगाव क्रेडाई संघटनेचे चेअरमन राजेश ठोळे तसेच विशाल, परेश आणि सार्थक यांच्या त्या आजी होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने जैन समाजासह कोपरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page